Maharashtra Vidhan Sabha Election Result : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काल 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडलं, त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली. मात्र अजूनही एका गोष्टीची चर्चा होतेय, ती म्हणजे फलोदी सट्टा बाजार. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-महायुतीचं सरकार स्थापन होणार असा फलोदी सट्टा बाजाराचा यंदाचा अंदाज आहे. तसंच झारखंडमध्ये एनडीए आघाडीचंच सरकार स्थापन होईल असा अंदाज आहे. तर राजस्थानमध्ये 7 पैकी 5 जागा भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता या सट्टा बाजारात वर्तवण्यात येतेय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Rahul Gandhi : गौतम अदानी यांना अटक करा... 'या' प्रकरणावरुन राहुल गांधींचे गंभीर आरोप
काही बड्या सट्टेबाजांच्या मते, महाराष्ट्रात भाजप महायुतीला एकूण 143 ते 146 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही आकड्यांचा भाव सध्या समान म्हणजेच एक रुपयाने सुरू आहे. तर महाराष्ट्रात एकट्या भाजपला 90 ते 93 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेचा भाव 40 पैशांपर्यंत आहे. तसंच सट्टेबाजांच्या मते झारखंडमध्ये एनडीए आघाडीला 44 ते 46 जागा मिळण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये एनडीए आघाडीचा भावही 40 पैशांवर चालू आहे.
पाहा सगळे Exit पोलचे आकडे
1. Electrol Edge Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 118 जागा मिळू शकतात
भाजप - 78
शिवसेना (शिंदे गट) - 26
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 14
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील
काँग्रेस - 60
शिवसेना (ठाकरे गट) - 46
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 44
2. Poll Diary Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 122-186 जागा मिळू शकतात
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-28
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 69-121 जागा मिळतील
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 25-39
3. CNX Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 160-179 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 100-119 जागा मिळतील
4. Matriz Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 150-157 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील
5. P - Marq Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 137-157 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 126-146 जागा मिळतील
6. LokShahi - Rudra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 125-140 जागा मिळतील
काँग्रेस - 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 38-42
7. JVC - Times Now Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 159 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 116 जागा मिळतील
8. Chanakya Strategies Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 152-160 जागा मिळू शकतात
भाजप - 90
शिवसेना (शिंदे गट) - 48
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 130-138 जागा मिळतील
काँग्रेस - 63
शिवसेना (ठाकरे गट) - 35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 40
9. Dainik Bhaskar Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 125-140 जागा मिळू शकतात
भाजप - 80-90
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 15-20
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळतील
काँग्रेस - 58-60
शिवसेना (ठाकरे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 50-55
10. Prajatantra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 127 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 149 जागा मिळतील.
ADVERTISEMENT