Baramati Vidhan Sabha : भाषणाचे अर्थ, बुथवरचा राडा, मतदानाचा टक्का वाढला..'या' गणितामुळे अजितदादांना फायदा?

सुधीर काकडे

• 09:14 AM • 21 Nov 2024

बारामतीत विजय कुणाचा होणार यावरुन वेगवेगळे चंग बांधले जात आहेत. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांनी मतांची जुळवणी कशी केली?

point

युगेंद्र पवार यांच्यासाठी पवारांनी जोर लावला का?

point

दोन्ही नेत्यांची भाषणं काय सांगतात?

Baramati Vidhan Sabha : राज्यभरात काल विधानसभा निवडणुका पार पडल्या. मतदान संपताच काल वेगवेगळ्या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी आपले अंदाजही वर्तवले आहेत. वेगवेगळे एक्झिट पोल पाहिल्यास राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातली परिस्थिती पाहता, राज्यात अपक्षांचा बोलबोला राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र ही सगळी आकडेमोड वगळता राज्यात आणखी एका गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे बारामती विधानसभा मतदार संघ. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वत: अजित पवार यांनाही युगेंद्र पवार यांच्याविरुद्ध लढावं लागलं आहे. त्यामुळे बारामतीत विजय कुणाचा होणार यावरुन वेगवेगळे चंग बांधले जात आहेत. 

हे वाचलं का?

 

अजित पवार-शरद पवारांच्या भाषणाचे मुद्दे

 

बारामतीमध्ये 18 नोव्हेंबरचा दिवस महत्वाचा होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या सांगता सभेत शरद पवार आणि अजित पवार यांची भाषणं महत्वाची होती. यातूनच पुढची लढत कशी असणार हे स्पष्ट होणार होतं. शरद पवार यांनी राज्यभर प्रचाराच्या वादळी सभा घेतल्या. यंदाच्या निवडणूक प्रचारात त्यांचा 'पाडा, पाडा, पाडा' हा डायलॉग आणि वळसे पाटलांना गद्दार म्हटल्यानं चर्चा झाली. मात्र शरद पवार यांनी ज्याप्रमाणे इतर ठिकाणी उमेदवारांविरोधाक आक्रमक  पवित्रा घेत भाषणं केली, त्यामुळे बारामतीत शेवटच्या दिवशी पवार काय बोलतील यावर सर्वांचं लक्ष होतं. अजित पवार यांना ते पाडा पाडा पाडा म्हणणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र शरद पवार तसं म्हणाले नाही. पवारांनी शांतपणे भाषण करत युगेंद्र पवार यांचं कौतुक करत त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची आहे असं सांगितलं. अजित पवार यांना पाडा असा थेट उल्लेख केला नाही. उलट या भाषणात त्यांनी 'अजित पवारांनी कामं केली, त्याबद्दल तक्रार नाही' असा उल्लेख केला. तर अजित पवार यांचाही सूर एकच होता. ते म्हणत होते की, लोकसभेला चुकलो, लोकसभेला तुम्ही साहेबांना मदत केली, विधानसभेला तुम्ही मला साथ द्या. त्यामुळे बारामतीकरांपुढे मोठा पेच होता. 

 

मतदानाच्या दिवशी बारामतीत  राडा

हे ही वाचा >>Electoral Edge Exit Poll: महायुती सरकारला धक्का! 'इतक्या' जागांवर MVA मारणार बाजी 

मतदानाच्यादिवशी बारामतीत अनेक मतदान केंद्रांवर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसलं. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार स्वत: ग्राऊंडवर फिरताना दिसल्या. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या गेल्या, बुथमध्ये पोलचिटच्या माध्यमातून काही गैरप्रकार झाले असे आरोप शर्मिला पवारांनी केले. तर अजित पवार यांनीही त्यांना सडेतोड उत्तरं देत सगळे आरोप फेटाळले. आपले कार्यकर्ते असं करणार नाही असं त्यांनी सांगितलं.

 

मतदानाचा टक्का वाढला 

 

बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. मात्र यंदा खुद्द अजित पवार मैदानात असल्यानं ही लढाई अटीतटीची होती. पवारांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप, भावनिक मुद्दे आणि अनेक कौटुंबिक गोष्टी या निवडणुकीत स्पष्ट दिसलं. बारामतीत काल तब्बल 71.03 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाकडून नोंदवलं गेलं.  2019 च्या तुलनेत बारामतीमध्ये मतदानाचा टक्का वाढला. कारण 2019 च्या निवडणुकीत बारामतीमध्ये 68.38 टक्के मतदान झालं होतं. राजकीय विश्लेषकांच्या मतांनुसार वाढलेली टक्केवारी अजित पवार यांच्या फायद्याची ठरू शकते.  2019 च्या निवडणुकीत अजित पवारांनी 1.67 मतं घेत विक्रमी विजय मिळवला होता. 

एकूणच ही सर्व गणितं पाहता, अजित पवार यांच्या बाजूनेच बारामतीचा कल असेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. तरी विजयी कोण होणार हे निकालातूनच स्पष्ट होईल. 

    follow whatsapp