MVA Manifesto: महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना किती रुपये मिळणार? मविआचा जाहीरनामा पाहिलात का?

मुंबई तक

10 Nov 2024 (अपडेटेड: 10 Nov 2024, 04:40 PM)

Mallikarjun Kharge On MVA Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या असून जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलीय.

Mallikarjun Kharge On MVA Manifesto

Mahavikas Aaghadi Manifesto

follow google news

बातम्या हायलाइट

point

मल्लिकार्जुन खर्गेंनी प्रसिद्ध केला मविआचा जाहीरनामा

point

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

point

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले?

Mallikarjun Kharge On MVA Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या असून जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलीय. महाविकास आघाडीनेही त्यांचा जाहीरनामा आज रविवारी घोषित केला. महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची घोषणा मविआने या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केली आहे. तसच 25 लाखांचा मोफत विमा, पदवीधर आणि डिप्लोमाधारकांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रपये देण्याची तरतूद मविआकडून करण्यात आलीय. मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठं विधान केलं. 'कृषी, ग्रामीण विकास, शहरी  विकास, आरोग्य क्षेत्राबाबत पाच गॅरंटी लागू केल्या जातील', असं खर्गे म्हणाले.

हे वाचलं का?

काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा

काँग्रेसने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसच महिलांना मोफत बससेवा देण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आलीय. लोकांना मोफत औषध, 25 लाखांचा मोफत आरोग्य विमा, जातीनिहाय जनगणना, 50 टक्के आरक्षणाचे नियम हटवणार, तामिळनाडू प्रमाणे व्यवस्था करणार, अशा मोठ्या घोषणा मविआने त्यांच्या जाहीरनाम्यात केल्या आहेत.

हे ही वाचा >>  Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले

शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ताही देणार असल्याचं मविआच्या जाहीरनाम्यात म्हटलंय. बेरोजगारांसाठी दरमहिन्याला 4 हजार रपये देण्यात येतील, असं आश्वासनही मविआकडून जनतेला देण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Train Jugaad Video : प्रवाशांनो! मुंबई लोकलमध्ये सीट नाही मिळत? 'या' व्यक्तीने केला भन्नाट जुगाड

मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहे. आज संपूर्ण देश मुंबईकडे पाहतो आहे. ही निवडणूक महाराष्ट्राला बदलण्यासाठी आहे. महालक्ष्मी योजनेबाबत घोषणा केल्यानंतर मोदींनी आमची खिल्ली उडवली. ते आमच्या योजनांवर टीका करत आहेत. देशात एकता ठेवण्यासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्राणाची आहुती दिली. आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्त सांडवलं आहे. विरोधकांवर हल्लाबोल करत खर्गे म्हणाले, त्यांनी मनुस्मृतीला स्वीकारून देशाचं विभाजन केलं आहे. 

    follow whatsapp