Dinanath Mangeshkar Hospital Latest Update : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नाकर्तेपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता, असा आरोप आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अनेक समित्यांकडून रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरु आहे.
ADVERTISEMENT
अशातच ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयाने चौकशी समितीचा अहवाल पुणे पोलिसांना दिला आहे. या रुग्णालयाच्या अहवालात कोण कोणते निष्कर्ष दिले आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष खालीलप्रमाणे
इंदिरा आयव्हीएफमध्ये (IVF) मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेण चूक होती. तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करायला पाहिजे होतं.
मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवलं होतं. मात्र यावेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होते का? पैसे द्या, नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. त्याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे.
हे ही वाचा >> वकील महिलेची पूर्ण पाठ काळी-निळी केली, रिंगण करून मारलं.. आरोपी गावातीलच हैवान!
अती जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आलेलं नाही. तिला सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं. इथे डिलिवरी झाली. मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिएक स्पेशलिस्ट उपलब्ध नव्हता. त्या महिलेला हार्ट अटॅकचा धोका वाढला आणि जवळपास दोन तास सीपीआर देत होते.
त्या महिलेची अवस्था गुंतागुंतीची होती. मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी पोस्टमार्टम केलेलं नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेच होतं. हे झालेलं नाही. या सगळ्यात IVF सेंटरची जबाबदारी महत्वाची आहे. त्यांनी लवकर दाखल केलं पाहिजे होतं.
हे ही वाचा >> सासू अनिता जावयासोबत का पळाली? खुद्द राहुलने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, "मी लग्नासाठी..."
ADVERTISEMENT
