Manoj Jarange : कुणाला पाडायचं ते जरांगेंनी स्पष्ट सांगितलं, पत्रकार परिषदेत काय काय मुद्दे मांडले?

मुंबई तक

10 Nov 2024 (अपडेटेड: 10 Nov 2024, 12:05 PM)

मनोज जरांगे यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्याबद्दल 'संभ्रम' शब्द सारखा वापरला जातोय, मात्र संभ्रम असण्याचं काहीच कारण, मराठा समाजात संभ्रम नाही, असं जरांगे म्हणाले.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

point

कुणाला पाडायचंय? मनोज जरांगे यांनी काय सांगितलं

point

फडणवीसांचं नाव घेऊन काय म्हणाले जरांगे?

Manoj Jarange on Vidhan Sabha : मनोज जरांगे यांनी विधानसभेतून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं. मनोज जरांगे यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्यानतंर अनेक उमेदवारांचं टेन्शन वाढलं होतं, तर दुसरीकडे मनोज जरांगेंच्या समर्थकांमध्ये अनेक इच्छुक आमदारकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांनी या निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतल असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्याबद्दल 'संभ्रम' शब्द सारखा वापरला जातोय, मात्र संभ्रम असण्याचं काहीच कारण, मराठा समाजात संभ्रम नाही, असं जरांगे म्हणाले.

हे वाचलं का?


हे ही वाचा >>BJP Manifesto : लाडक्या बहिणींचे पैसे वाढवणार, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी मोठी आश्वासनं, भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?

 

आपण आरक्षणासाठी एकत्र आलोत. मराठा समाजात संभ्रम नाही. ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्यांना सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. आपलं कोणी काहीही करू शकत नाही, कोणाचीही सत्ता येऊद्या, देवेंद्र फडणवीस सुध्दा काही करू शकत नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. स्वत: निवडून येण्यासाठी काहीजण संभ्रम पसरवत आहेत. लोकसभेला सन्मान मराठा समाजाला होता. मी आता कारभार मराठ्यांच्या हातात दिलाय. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, मतदान तुमच्या हातात आहे. तुमच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला , त्याला पाडा असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

 


मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाने गावागावात आपल्या आंदोलनाशी सहमत असणाऱ्या उमेदवारांचा व्हिडिओ घ्या. गाव पातळीवर प्रत्येक गावात, कार्यकर्त्यांनी उमेदवाराकडून व्हिडिओ करून घ्या. मी कुणाला पाडण्यासाठी पक्षाचं नाव सांगितलं नाही. राज्यभरात कुणालाच पाठिंबा दिला नाही. मी त्यातून अलिप्त झालो, माझा पाठिंबा मविआ , महायुती , अपक्ष यांना कुणालाही नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. राजकारणापेक्षा आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

    follow whatsapp