Sharad Pawar: "देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदी...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 04:46 PM)

Sharad Pawar On Pm Narendra Modi: लोकसभेची निवडणूक झाली आणि तो निर्णय तुम्ही लोकांनी दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती.

Sharad Pawar On PM Narendra Modi

Sharad Pawar On PM Narendra Modi

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

point

"महाराष्ट्राच्या डोक्यावर 3 लाख 20 हजार कोटीचं कर्ज..."

point

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar On Pm Narendra Modi: लोकसभेची निवडणूक झाली आणि तो निर्णय तुम्ही लोकांनी दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती. त्याचं महत्त्वाचं कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्ता हातात आल्यानंतर वेगळ्या विचारात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमुळं देश आज एकसंध आहे. पण त्यामध्ये काही बदल करावा अशाप्रकारचा विचार त्यांच्या मनात होता. हा देश इतके वर्षे एकसंध राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेली घटना, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. ते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेत इंदापूरमध्ये बोलत होते. 

हे वाचलं का?

यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर नेहमी पहिलाच होता. महाराष्ट्र कधी दुसऱ्या नंबरवर गेला नाही. भाजप फडणवीसांचं राज्य आलं आणि महाराष्ट्र पहिल्यानंबरवरून सहाव्या नंबरवर गेला. आज महाराष्ट्रातून परदेशात माल जातो. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या  डोक्यावर 3 लाख 20 हजार कोटीचं कर्ज होतं. गेल्या दोन वर्षात ही सत्ता भाजपच्या हातात गेली, त्यामुळे 3 लाखांवरचं कर्ज 8 लाख रूपयांवर पोहोचलं आहे. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर डागली तोफ, म्हणाले; " बाळासाहेबांची मशाल हातात घेऊन..."

एक काळ असा होता, जेव्हा उद्योगधंद्यात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होता. आजही काही प्रमाणात आहे. पण त्यावेळची आणि आजची स्थिती वेगळी आहे. एकेकाळी कारखानदारी म्हणजे किर्लोस्कर..कारखानदारी म्हणजे गरवारे, अशी नावं ऐकायला मिळायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आलं. त्यांनी वेगळा विचार केला. मुंबई आर्थिक शहर झालं. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती कशा सुरु करता येईल, याचा त्यांनी विचार केला.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "मला गद्दाराला गाडायचंय, कोणत्याही परिस्थितीत...", कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या सभेतही शरद पवारांनी विरोधकांना धारेवर धरलं. "कर्जत-जामखेड या भागात गेल्या पाच वर्षांपासून रोहितला तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी बनवला. या शहरात, या जिल्ह्यात, या मतदारसंघात जे जे विकासाची कामं आहेत. त्याकडे रोहितचं लक्ष आहे. या तालुक्यात दहा वर्ष एक आमदार होता. तो पाच वर्ष मंत्री होता. काय दिवे लावले त्यांनी? या दहा वर्षात केलं काय? असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनी विरोधकांना सुनावलं.

    follow whatsapp