Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर डागली तोफ, म्हणाले; " बाळासाहेबांची मशाल हातात घेऊन..."

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 04:03 PM)

Uddhav Thackeray On Shivsena Shinde Group : "गेल्या अडीच वर्षात आपल्या आशीर्वादाने जे सरकार सुरु होतं, ते सरकार कोणत्या पद्धतीने पाडण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या इच्छेविरुद्ध बसवण्यात आलं, हे सर्व आपण भोगतो आहोत.

Uddhav Thackeray On Shivsena Shinde Group

Uddhav Thackeray On Shivsena Shinde Group

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर डागली तोफ

point

"ही बाळासाहेबांची मशाल..शिवसेनाप्रमुखांची मशाल आहे, आणि..."

point

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Shivsena Shinde Group : "गेल्या अडीच वर्षात आपल्या आशीर्वादाने जे सरकार सुरु होतं, ते सरकार कोणत्या पद्धतीने पाडण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या इच्छेविरुद्ध बसवण्यात आलं, हे सर्व आपण भोगतो आहोत. अडीच वर्ष झाली, न्याय मागतो आहोत, अजूनही न्याय मिळत नाही. आपण असं म्हणतो की, न्यायाला विलंब लावणे म्हणजे न्याय नाकारणे, हा एकप्रकारे न्याय नाकारला जातोय. न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल, तर जसं लोकमान्य टीळक म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपल्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलो आहे. ही बाळासाहेबांची मशाल..शिवसेनाप्रमुखांची मशाल आहे आणि मी माझ्या मताने ही बेबंदशाही जाळून टाकणार म्हणजे टाकणार. उतरा आणि जाळून भस्म करा, असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करत पुढे म्हणाले, "या लोकांनी आपला पक्ष तर चोरलाच. दिवसाढवळ्या दरोडा घातला. आपला पक्ष चोरला. आपलं नाव चोरलं. पक्षाचं चिन्ह चोरलं. शिवसेनाप्रमुखांचा फोटोही चोरला आणि ते म्हणतात त्यांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. हे सगळं चोरलं, पण मी फक्त आपल्या आशीर्वादाने ठाम उभा आहे. त्यांनी सर्व माझ्याकडून चोरलं. पण एक  गोष्ट ते माझ्याकडून चोरू शकत नाहीत. तुमचं प्रेम, तुमचा आशर्वाद आणि तुमचा विश्वास ते चोरू शकत नाहीत.

हे ही वाचा >> Maharashtra Vidhansabha Election 2024: 'रोहित पवारांना मुख्यमंत्री करणार?', शरद पवारांचं मोठं विधान!

"मी या बेबंदशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई लढतोय. त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. माझ्या देशातली लोकशाही टीकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. या लढाईत केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीय. तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचं काम सुरु आहे. महाराष्ट्राला गुलाम बनवायचं काम सुरु आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचं? मला तरी हे पटत नाही. आपल्या कुटुंबात जेव्हढे मतदार आहेत, त्या सर्वांनी उतरा आणि जिथे जिथे आपले उमेदवार उभे आहेत, त्यांना भरघोस मतं द्या. ही बाळासाहेबांची मशाल..शिवसेनाप्रमुखांची मशाल आहे आणि मी माझ्या मताने ही बेबंदशाही जाळून टाकणार म्हणजे टाकणार. उतरा आणि जाळून भस्म करा, असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "मला गद्दाराला गाडायचंय, कोणत्याही परिस्थितीत...", कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले

कर्जतच्या सभेतही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर तोफ डागली. "कोरोनाच्या काळात मी फेसबुक लाईव्ह केलं. तुम्ही सर्वांनी ऐकलं. म्हणून महाराष्ट्र वाचला. मिंधे तर गद्दारच आहेत. पण मी भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न विचारायचंय, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता. त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनेही महाराष्ट्राला पैसे दिले नव्हते. तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते. हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम..महाराष्ट्र तळमळत होता. औषधं, ऑक्सिजन मिळत नव्हतं. रुग्णालये मिळत नव्हती. आपण संपूर्ण ताकदीनीशी लढत होतो. तेव्हा हे सर्व भाजपवाले पीएम केअर फंडात पैसे देत होते, असं ठाकरे म्हणाले. 

    follow whatsapp