Uddhav Thackeray Latest Speech : "मी ज्या क्षणी वर्षा सोडला आणि मी माझ्या घरी मातोश्रीला निघालो. मला तेव्हा कोरोना झाला होता. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली होती. कोरोनासारखा भयानक आजार झाल्यामुळे तुम्ही जनतेत जाऊ नका, असं त्यांनी सांगितलं. पण मी म्हणालो, जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार. मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मातोश्रीला निघालो. रस्त्यात तोबा गर्दी होती. हे सर्व महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवत होतो. त्याचक्षणी हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन टेबलावर नाचत होता. गद्दारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो का?" असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते शिवसेना ठाकरे गटाचे कर्जतचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "कोरोनाच्या काळात मी फेसबुक लाईव्ह केलं. तुम्ही सर्वांनी ऐकलं. म्हणून महाराष्ट्र वाचला. मिंधे तर गद्दारच आहेत. पण मी भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न विचारायचंय, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता. त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनेही महाराष्ट्राला पैसे दिले नव्हते. तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते. हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम..महाराष्ट्र तळमळत होता. औषधं, ऑक्सिजन मिळत नव्हतं. रुग्णालये मिळत नव्हती. आपण संपूर्ण ताकदीनीशी लढत होतो. तेव्हा हे सर्व भाजपवाले पीएम केअर फंडात पैसे देत होते. त्यांचा गोरे नावाच्या उमेदवारावर आरोप आहेत. हाय कोर्टाने ताशेरे मारले आहेत. मृत व्यक्तींना जीवंत आहेत, असं दाखवून त्यांच्यावर उपचार केले आणि त्याचे पैसे हडप केले", असा हा भाजपचा उमेदवार. मला गद्दाराला गाडायचंच आहे. कोणत्याही परिस्थितीत गाडायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
हे ही वाचा >> Rahul Gandhi : 'एक हैं तो सेफ हैं' घोषणेची खिल्ली उडवली, राहुल गांधींचा PM मोदी-अदानींवर निशाणा
"दादागिरीचं माझ्यावर सोपवा. तुम्ही फक्त नितीन सावंतला निवडून द्या. याला खडी फोडायला पाठवतो. एकतर गद्दार, सर्व चोरीचा मामला. आपलंच नाव चोरलंय. निशाणी चोरली आणि हसत मोठा फोटो लावलाय. चोर तर चोर वर शिरजोर. ही मस्ती उतरवायची नाही, तर काय डोक्यावर घेऊन फिरवायची. पाच वर्ष हा आमदार होता. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, माझ्याकडे हा एकही विकासाचं काम घेऊन आला नाही. अडीच वर्ष झाल्यानंतर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. खोके घेऊन तिकडे गेला आणि जनतेला धोका दिला. माझ्यावर आरोप करा, पण अडीच वर्षात या कर्जत मतदार संघात किती विकासकामे केली?" असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हे ही वाचा >> Gold Rate Today : सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड! किती रूपयांनी घसरले दर? वाचा 24 कॅरेटचा भाव
ADVERTISEMENT