CM Eknath Shinde Nashik : नाशिक जिह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी सुहास कांदे गेल्यावेळीपेक्षा जास्त लीडने निवडून येतील आणि विरोधकांच्या डोळ्यातून पाणी काढतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्यक्त करण्यात आला. मात्र दुसरीकडे आता सभेतल्या आणखी एका प्रकाराची चर्चा होते आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणासाठी आलेल्या लोकांना संभास्थळीच कोंडून ठेवण्यात आल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>CM Eknath Shinde: "गुंडा असावा असा, ज्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा...", शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी नांदगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेवेळी आलेल्या महिलांना जबरदस्तीने आत बसण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचं दिसून आलं. या सभेनंतर समोर आलेल्या व्हिडीओमधून लोकांना थेट कोंडून घेण्यात आल्याचं दिसतंय. तरीही हा नेमका प्रकार काय हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
ADVERTISEMENT