Maharashtra Election: मुंबईच्या मतदारांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वे चालवणार स्पेशल ट्रेन, 'असं' आहे शेड्युल

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 02:23 PM)

Special Train For Election 2024:  राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Special Trains For Maharashtra Election 2024

Special Trains For Maharashtra Election 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

निवडणुकीआधाची मतदारांसाठी आनंदाची बातमी

point

स्पेशल ट्रेनचं शेड्युल कसं असणार?

point

रेल्वेचं 'ते' ट्वीट एकदा वाचाच

Special Train For Election 2024:  राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक अधिकारी आणि मतदारांना वेळेवर मतदान करता यावं यासाठी 19-20 2024 नोव्हेंबरला (मंगळवार-बुधवार रात्र) आणि 20-21 नोव्हेंबर 2024 (बुधवार-गुरुवार रात्र) या कालावधीत स्पेशल उपनगरीय ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आलीय. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यात कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये आणि निवडणुकीच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना वेळेवर पोहचता यावा, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

हे वाचलं का?

मुंबईतील मतदारांसाठी आनंदाची बातमी

या विशेष ट्रेन मुंबईची मेन लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल) या मार्गावर चालवली जाईल. रात्रीच्या वेळी जास्त ट्रेन चालवण्यात येतील. जेणेकरून मतदारांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचता येईल. मध्य रेल्वेने स्पेशल उपनगरीय ट्रेनसाठी प्रस्थान आणि आगमनाच्या वेळेचं शेड्युल जाहीर केलं आहे.

हे ही वाचा >>  Uddhav Thackeray: "मला गद्दाराला गाडायचंय, कोणत्याही परिस्थितीत...", कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले

ट्रेनच्या वेळेबाबतची माहिती रेल्वे विभागाकडून प्रवाशांना लवकरच सांगितली जाणार आहे. रेल्वेने असंही जाहीर केलंय की, विशेष ट्रेन फक्त 19-20 आणि 20-21 नोव्हेंबरच्या रात्री चालवण्यात येतील. ज्यामुळे मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. याचदरम्यान, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि स्थानिक पोलिसांकडून ट्रेनच्या सुरक्षेबाबत माहिती दिली जाईल.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी, गौतम अदानींवर हल्लाबोल!

निवडणूक असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ शकते. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळं लोकांना खूप सुविधा दिल्या जातील. कारण यामुळे मतदारांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात समस्या निर्माण होणार नाही. ज्या विभागात परिवहन सेवेची सुविधा अल्प प्रमाणात उपलब्ध असेल, अशा ठिकाणी रेल्वेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष उपनगरी रल्वेसेवेमुळे मतदान प्रकियेत फायदा होईलच, याशिवाय निवडणूक कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. 


 

    follow whatsapp