Raj Thackeray : "आमच्याकडेही थर्ड अम्पायर असता तर, गेल्या निवडणुकीत....", सचिनसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

सुधीर काकडे

03 Dec 2024 (अपडेटेड: 03 Dec 2024, 09:57 PM)

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 128 उमेदवार मैदानात होते, त्या सर्वांचा पराभव झाला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनाही आता निवडणूक आयोगावर किंवा EVM शंका आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

point

मनसेच्या सर्व उमेदवारांचा विधानसभेत पराभव

point

पराभवानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात बोलले राज ठाकरे

Raj Thackeray Speech Dadar Mumbai : जसं क्रिकेट बदललं, तसं राजकारणही बदललं असं म्हणत राज ठाकरे यांनी विधानासभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. दादरमध्ये क्रिकेट प्रशिक्षक दिवंगत रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी अगदी मोजक्या शब्दात निवडणुकीत झालेल्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली. (Raj Thackeray said If we had a third umpire in the last election many decisions would have change)

हे वाचलं का?

काय म्हणाले राज ठाकरे? 

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह क्रिकेशी संबंधीत अनेक लोक मंचावर असताना राज ठाकरे म्हणाले की, "जसं क्रिकेट बदललं तसं राजकारणंही बदललं आहे. तुमच्याकडे अम्पायर आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो, गेल्या निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर अनेक निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते कदाचित. पण आमच्याकडे थर्ड अम्पायर नाही असं राज ठाकरे म्हणाले." त्यामुळे  राज ठाकरे यांनाही आता निवडणूक आयोगावर किंवा EVM शंका आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.

 

हे ही वाचा >> Mohit Kamboj Vs Gajabhau : मोहित कंबोज यांचं पुन्हा ट्विट, 'गजाभाऊ'कडून पुन्हा उत्तर, म्हणाला बापाचं नाव...
 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 128 उमेदवार मैदानात होते. विशेष म्हणजे ज्या दादरमध्ये हा आजचा कार्यक्रम पार पडत होता, त्याच दादर-माहिम विधानसभा मतदारसंघातच स्वत: राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढत होते. मात्र मनसेचा या निवडणुकीत अक्षरश: सुपडा साफ झाला. या पराभवानंतर मनसेच्या नेत्यांची बैठकही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या बैठकीत काही नेत्यांनी EVM वर शंका उपस्थित केल्याचीही चर्चा होती. 

दरम्यान, दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ एक खास प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या स्मारकाचं आज अनावरण करण्यात आलं. या स्मारकातील प्रतिकृतीमध्ये बॅट, स्टंप, हेल्मेट अशा गोष्टींचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह शेकडो खेळाडूंना रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचे धडे दिले आहेत. आजही शेकडो खेळाडू या मैदानावर येऊन मोठा खेळाडू होण्याचं स्वप्न पाहत असतात. त्या सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळाली या हेतूनं हे स्मारक तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात शिवाजी पार्कमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी हे एक प्रेरणास्थान असणार आहे.

    follow whatsapp