Shrikant Shinde : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय. एकीकडे शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यामुळे कुठलाही अडचण वाटू देऊ नये असं म्हणत भाजपसाठी निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा केला होता. मात्र त्यानंतर अजूनही शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना ब्रेक लागलेला नाही. त्यातच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं दिसलं, ज्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावं चर्चेत आले. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चांमध्ये श्रीकांत शिंदेंचंही नाव असल्याचं बोललं जात होतं. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे आता श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री होतील का? असं म्हटलं जात होतं. त्यावर आता श्रीकांत शिंदे यांनी स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
ADVERTISEMENT
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
हे ही वाचा >> Mohit Kamboj : "जिथे असशील तिथून उचलून आणू...", मोहित कंबोज यांचा थेट इशारा, कोण आहे गजाभाऊ?
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.
हे ही वाचा >> Mohit Kamboj : "जिथे असशील तिथून उचलून आणू...", मोहित कंबोज यांचा थेट इशारा, कोण आहे गजाभाऊ?
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, मुख्यमंत्री कोण होईल? हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी होईल. त्यामुळे आता पुढच्या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT