Jayant Patil : 'हे मतदान कसं वाढलं? EVM मशिनमध्ये...', जयंत पाटील यांनी सांगितली A to Z स्टोरी

मुंबई तक

• 06:27 PM • 01 Dec 2024

Jayant Patil Press Conference : राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मोठं भाष्य केलं.

Jayant Patil Press Conference

Jayant Patil Press Conference

follow google news

बातम्या हायलाइट

point

आमदार जितेंद्र आव्हाड यांची गटनेते म्हणून निवड

point

रोहित आर आर पाटील यांनाही दिली मोठी जबाबदारी

point

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil Press Conference : राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मोठं भाष्य केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रोहित आर आर पाटील यांची राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसच पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

हे वाचलं का?

जयंत पाटील पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

"पाच वाजल्यानंतर जवळपास 8 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रात मतदान वाढलं. मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. याबाबतीत सर्वांनी चिंता व्यक्त केली. हे मतदान कसं वाढलं..आम्हाला असं सांगण्यात आलं की, ईव्हीएम मशिन सिम्पल कॅल्क्यूलेटर आहे. मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतदान वाढत जाणं...मतदान पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडेवारी दिली जाते, त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे. आमच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकटवाडी येथील जनतेनं एकत्रित येऊन निर्णय घेतलाय की, जे मतदानं झालंय तसं होणार नाही. निवडून आलेले उत्तम जानकर यांच्या मतदारसंघात मरकटवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू. मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि माध्यमांसमोर त्याची मतमोजणीही होईल, असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

हे ही वाचा >> Eknath Shinde : "मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय...", ठाण्यात पोहोचताच शिंदेंचं मोठं विधान!

पाटील पुढे म्हणाले, "पक्ष कार्यालयात आजच बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून निवडण्यात आलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना जोडून प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली. 

हे ही वाचा >> EVM Hacking Row : "इव्हीएम हॅकींगचा दावा खोटा...", निवडणूक आयोगाची माहिती, 'त्या' व्यक्तिविरोधात FIR

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, "विधिमंडळातील विधानसभेचे, विधानपरिषदेचे सदस्य आज उपस्थित न झाल्याने विधिमंडळ नेत्याबाबत पुढील काळात अधिवेशन चालू असताना बैठक होईल. त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आज सर्व दहापैकी नऊ सदस्य उपस्थित होते. आज विधिमंडळात राष्टवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्य कमी जरी असली, तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील", असंही पाटील म्हणाले.  

    follow whatsapp