Sanjay Raut Vs Raj Thackeray : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय. या सभांमधून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही निशाणा साधला. त्यावर बोलताना त्यांनी ठाकरेंची शिवसेना आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत नाही, तर फक्त पंजाचा प्रचार करतंय असं म्हटलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. तसंच अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देण्याचं कारणही सांगितलं.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. राज ठाकरे यांना गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व एकदाच करायचं आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रचार करत आहेत. शरद पवारांचीही लढाई महाराष्ट्रासाठी आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची ज्या मोदी-शाहांनी लूट चालवलीय, त्यांच्यासोबत हे महाशय उभे राहिले असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच आम्हाला राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना थोडं भान ठेवा, महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांविरोधात ठाकरेंची लढाई सुरू आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Prakash Ambedkar : ...तर अजित पवारांनी आमच्यासोबत यावं, प्रकाश आंबेडकरांनी का दिली ऑफर?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या दादर-माहिम मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटला आहे. एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्या लढतीवरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. तसंच या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचाही उमेदावर आहे. महेश सावंत यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होते आहे. एकीकडे राज ठाकरे वारंवार 2019 च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करुन देत असले, तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मतदारसंघ आम्हीच सोडूच शकत नाही असं सांगितलं जातंय. आज राज ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या मुद्द्याचा पुनरोच्चार केला.
...म्हणून दादर माहिम मतदारसंघ सोडू शकत नाही
दादर-माहिम प्रभादेवी इथे शिवसेनेचा जन्म झाला, ते आम्हाला कुणाला देता येणार नाही. 77 ए रानडे रोड हा शिवसेनेचा पत्ता होता आधी, त्यामुळे ती जागा आम्हाला लढावीच लागणार आहे असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंची बॅग तपासली, राऊतांचा संताप
उद्धव ठाकरे काल यवतमाळमधील वणीमध्ये हेलिपॅडवर उतरले असता, त्यांचं हेलिकॉप्टर तपासण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत त्या सर्व प्रकाराचा व्हिडीओ घेतला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची तपासणी करण्याला आक्षेप नाहीच, मात्र सर्वांना समान न्यायाने वागवायला पाहिजे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही समान वागणूक द्या. पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT