Milind Narvekar Tweet On Rashmi Shukla: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगलीय. कारण राज्याच्या पोलीस महासंचालर पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी काँग्रेससह ठाकरे गटाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्वीटमुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कारण रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा निवड झाल्यावर नार्वेकरांनी एक्सच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट भाजपशी मिळतं जुळतं करतंय का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीने शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शुक्लाचं जाहीरपणे अभिनंदन केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून रश्मी शुक्लांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: 'मविआच्या पराभवाचं नेमकं कारण काय?'; अंबादास दानवे म्हणाले, "EVM मध्ये बऱ्याच ठिकाणी..."
इथे पाहा मिलिंद नार्वेकरांचं 'ते' ट्वीट
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सरकारने शुक्ला यांना रजेवर पाठवलं होतं. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात यावे, असे आदेश आयोगाने दिले होते.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत, एकनाथ खडसे यांनी शुल्कांवर फोन टॅपिंगचे आरोप केले होते. अशातच नार्वेकर यांनी शुक्ला यांचं अभिनंदन केल्यानं शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, असे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा >> Eknath Shinde News: "एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, कारण...", शिवसेनेच्या 'या' नेत्यानं सांगितलं सर्व प्लॅनिंग
राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरु असतानाच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदावरून बदली केली होत. त्यानंतर या पदावर संजय वर्मा यांना नियुक्त करण्यात आलं होतं. परंतु, आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांची पुन्हा महासंचालपदी नियुक्ती करण्यात आलीय.
ADVERTISEMENT