VIDEO : 'चोरी करायला आलो का आम्ही?', प्रतिभाकाकी पवार, रेवती सुळेंना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये अडवलं!

मुंबई तक

17 Nov 2024 (अपडेटेड: 17 Nov 2024, 05:58 PM)

Pratibhakaki Pawar And Revati Sule Viral Video : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पुन्हा रंगणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Baramati Textile Park Viral Video

Baramati Textile Park Viral Video

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामती टेक्सटाइल पार्कच्या गेटवर प्रतिभाकाकी पवार आणि रेवती सुळेंना अडवलं

point

बारामती टेक्सटाइल पार्कचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

point

राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण

Pratibhakaki Pawar And Revati Sule Viral Video :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पुन्हा रंगणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच बारामतीच्या एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये प्रवेश करण्यास रोखलं. जवळपास अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं, तरीही त्यांना पार्कमध्ये प्रेवेश करु दिला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पत्नी पत्नी प्रतिभाकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. पण त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये प्रवेश मिळाला नाही. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आहेत. सध्या बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

हे ही वाचा >> Supriya Sule: "बहिणीच्या नात्याची किंमत 1500, पण..."; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रतिभाकाकी पवार आणि रेवती सुळे यांच्या आगमनाआधीच या टेक्स्टाईल पार्कचा गेट लावण्यात आला. सचिन वाघ यांचा फोन आला, म्हणून गेट बंद करण्यात आला, अशी माहिती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर असलेल्या सेक्युरिटीनं दिल्याचं समजते. दरम्यान, आम्ही चोरी करायला आलो नाही, आम्ही शॉपिंगला आलो आहोत. आम्ही इथे आलो आहोत, म्हणून तुम्ही गेट बंद केला का? कुणाच्या आदेशामुळे गेट बंद करण्यात आला? असा सवाल प्रतिभाकाकी पवार यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुपिया सुळे यांच्यात राजकीय सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला. परंतु, आता विधानसभेत पुन्हा पवार कुटुंबात राजकीय सामना होणार आहे. तत्पूर्वी, या व्हायरल व्हिडीओमुळं अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

    follow whatsapp