Supriya Sule: "बहिणीच्या नात्याची किंमत 1500, पण..."; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई तक

17 Nov 2024 (अपडेटेड: 17 Nov 2024, 04:41 PM)

Supriya Sule On Ladki Bahin Yojana:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केलीय. बुधवारी 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Supriya Sule On Ladki Bahin Yojana

Supriya Sule On Ladki Bahin Yojana

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

point

 "महाराष्ट्राची परिस्थिती वाईट झाली आहे, अदृश्य शक्तीने..."

point

खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule On Ladki Bahin Yojana:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केलीय. बुधवारी 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्षांनी महायुतीला धारेवर धरलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. "बहीणीच्या नात्याची किंमत 1500 रुपये लावली आहे. बहीण भावाचे नाते असे पैशात मोजता येत नाही. मी सर्वात लाडकी बहीण आहे. लोकसभेनंतर लाडकी बहीण झाले आहे. आमची लाडकी बहीण पुढेही लाडकीच राहणार आहे. आम्ही महालक्ष्मी योजनेतून दरमहा 3 हजार रुपये देणार आहोत, असं मोठं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राची परिस्थिती वाईट झाली आहे. अदृश्य शक्तीने पक्ष फोडले, चिन्ह नेले. पण आमच्या युवक युवतीच्या हक्काच्या सहा लाख नोकऱ्या का हिरावून घेतल्या? सर्वात मोठी पारदर्शक पोलीस भरती आर आर आबांच्या काळात झाली.आपण सत्तेवर  आल्यावर पुन्हा सर्वात मोठी भरती करूया. सध्या महागाई आणि बेरोजगारी हे सर्वात मोठं आव्हान आहे. भाजपच्या काळात महागाई आणि बेरोजगारी मध्ये बेसुमार वाढ झाली आहे.  ती वाढवणाऱ्या महायुतीला या निवडणुकीत पराभूत करा, असं आवाहन सुळे यांनी केलं आहे. भाजपा पूर्वी चांगला पक्ष होता, आता बिघडला आहे. संगतीचा असर झाला आहे. कोणता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्याला लाथ मारतो हो. पण यांच्यात हे घडतंय.

हे ही वाचा >> Priyanka Gandhi: "मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी...", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"धंनजय महाडिक कसे म्हणू शकतात की  त्या महिलांचे फोटो काढून ठेवा. एका जरी महिलेचा तिला न सांगता फोटो काढला तर तुम्हाला पोलीस  स्टेशन दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही सुप्रिया सुळेंनी दिला.शेतकऱ्यांना दुधाचे फक्त 26 रुपये मिळतात. उरलेले 28-30 रुपये हे मधले बोके खातात. उद्या प्रचार संपेल. त्यानंतर रात्र वैऱ्याची आहे. जे चहा पाणी देतील, ते दोन्ही हातांनी घ्या मी चहा बद्दल बोलतेय हं, अशी मिश्किल टीप्पणीही सुळेंनी केली. मराठा, धनगर, मुस्लिम, ओबीसी, आणि भटके विमुक्त यांच्या आरक्षणाबद्दल सर्वात आधी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणत भाजपने धनगर समाजाची सातत्याने  फसवणूक केली आहे. त्यामुळे 20 तारखेला मतदान करताना आपली फसवणूक कोणी केली हे लक्षात ठेवायचं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो...", उद्धव ठाकरेंची CM शिंदेंवर घणाघाती टीका

    follow whatsapp