Maharashtra Vidhan Sabha : ठाकरेंचा मोठा प्लॅन! स्वतंत्र लढण्याची तयारी! Inside Story

ऋत्विक भालेकर

• 06:47 PM • 14 Jun 2024

Uddhav Thackeray Shiv Sena : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक लढवलेल्या जिंकलेल्या ठाकरेंनी आता विधानसभेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. विधानसभा संपर्कप्रमुखांना 10 प्रश्नांच्या आधारे माहिती मागितली असून, स्वबळावर लढण्याचीही चाचपणी सुरू केली आहे.

विधानसभा निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली तर काय निकाल येतील, याची चाचपणी उद्धव ठाकरेंनी सुरु केली आहे.

महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी?

point

सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांकडून मागवली माहिती

point

शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वबळाची चाचपणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक आटोपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यानुषंगाने ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आणि शिवसेना स्वबळावर लढल्यास काय निकाल येतील, याची चाचपणीही सुरू केली आहे. ठाकरेंचा प्लॅन काय आणि कोणत्या मुद्द्यांवर ठाकरेंनी संपर्कप्रमुखांकडून अहवाल मागवला आहे, हेच सगळं जाणून घ्या. (Uddhav Thackeray is taking what will be the results if Shiv Sena fights independently in the Maharashtra assembly elections 2024)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणूक पार पडली. देशात विरोधकांना अपेक्षित यश मिळू शकले नाही, पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जागा जिंकत भाजपची बरोबरी केली आहे. 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी दोन्ही पक्षांच्या तुलनेत अधिक चांगली राहिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी 10 जागा जिंकल्या आणि त्यापैकी 8 जागा जिंकल्या आहेत. 

उद्धव ठाकरेंकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेने मविआतील मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय निकाल येऊ शकतो, याचा मागितला अहवालच ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांकडून मागवला आहे.

हेही वाचा >> "अहंकारी झाले म्हणूनच 241 जागा मिळाल्या", RSS ची भाजपवर तोफ 

विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे)अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसेच संभाव्य विजयाचे समीकरण कसे असेल, याबाबत ठाकरेंनी विधानसभा संपर्कप्रमुखांकडून अहवाल मागितला आहे.

स्वतंत्र लढण्याबद्दल चाचपणी

ज्या दहा मुद्द्यांच्या आधारे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांना अहवाल सादर करायचा आहे, त्यात एक महत्त्वाचा मुद्दा स्वबळाचाही आहे. 'फक्त शिवसेना विधानसभा निवडणूक लढली तर काय होईल', याबद्दलही संपर्कप्रमुखांना माहिती द्यायची आहे.

हेही वाचा >> लोकसभेचा निकाल लागताच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या!

विधानसभा संपर्कप्रमुख कसा बनवणार अहवाल?

1) लोकसभा निवडणूक 2024 चे विधानसभा मतदारसंघनिहाय निकाल.

2) यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न असण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

3) शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?

4) महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?

5) सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?

6) संभाव्य विजयाचे समीकरण कसे असेल?

7) फक्त शिवसेना लढली तर काय होईल?

8) मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?

9) बीएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

10) लोकसभा निवडणूक 2024 आपला अभिप्राय थोडक्यात?

हेही वाचा >> शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण?

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळू शकते, असेच निकाल विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या खासदारांना मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे मविआचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसत असून, त्यांचे नेतेही तसे बोलून दाखवत आहेत. 

    follow whatsapp