Baramati: 'मला एक संधी देऊन बघा... पाहा काय करून दाखवतो', युगेंद्र पवार असं म्हणताच...

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 05:13 PM)

Yugendra Pawar Baramati Speech : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलं आहे.

Yugendra Pawar Baramati Speech

Yugendra Pawar Baramati Speech

follow google news

बातम्या हायलाइट

point

युगेंद्र पवारांनी बारामतीच्या सभेत जनतेला केलं मोठं आवाहन

point

"आज मला एक संधी देऊन बघा.."

point

युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?

Yugendra Pawar Baramati Speech : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही संपूर्ण राज्याचं बारामती विधानसभा मतदारसंघावर लक्ष लागलं आहे. अशातच युगेंद्र पवारांनी बारामतीच्या सभेत मोठं भाष्य केलं."लोकप्रतिनिधी म्हणून, सेवक म्हणून दिवस रात्र मी बारामतीकरांसाठी करत राहीन. जे काही प्रश्न असतील. ज्या काही अडचणी असतील. तुम्ही थेट माझ्यापर्यंत येऊ शकता. थेट तुम्ही मला फोन करू शकता मध्ये कोणतीच फळी नाहीए, असं युगेंद्र पवार म्हणाले.

हे वाचलं का?

युगेंद्र पवार पुढे म्हणाले, थेट तुम्ही माझ्याशी बोलू शकता, भेटू शकता.. कुठलीच फळी नाही. तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही फोन केला तर मी फोन उचलतो, बोलतो.. अशाच एका लोकप्रतिनिधींची आपल्याला गरज आहे. याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. शाश्वत विकास आपण करणार आहोत. पवार साहेबांचा स्वाभिमान आपल्याला जपायचा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांचं वारं आहे आणि बारामतीत पण आहे. हे तुम्ही सगळ्यांनी ते दाखवून दिलंय. 

हे ही वाचा >> Sharad Pawar: "देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदी...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?

आज मला एक संधी देऊन बघा.. तुम्ही दुसऱ्यांना अनेक संधी दिली आहे. (युगेंद्र पवारांनी असं म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला) तरी पण आपली कामं अडकली आहेत. बरीच वर्ष तीच-तीच कामं अडकली आहेत. जास्त चांगला विकास करून दाखवतो, शाश्वत विकास करून दाखवतो. मी सर्वसामान्य लोकांची कामं करून दाखवतो. अलीकडे कोणाची कामं होतात हे तुम्हाला माहिती आहे. आज मी त्यावर जास्त बोलत नाही. पण जी जनता आहे जे इथे उपस्थित आहेत. जी बारामतीतील स्वाभिमानी लोकं आहेत त्यांची कामं झाली पाहिजेत. ती कामं आपण इथून पुढे करू, असंही युगेंद्र पवार म्हणाले.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर डागली तोफ, म्हणाले; " बाळासाहेबांची मशाल हातात घेऊन..."

    follow whatsapp