Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन

रोहित गोळे

11 Aug 2024 (अपडेटेड: 12 Aug 2024, 12:55 PM)

Mumbai Tak Baithak: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच उरलेले असतानाच मुंबई Tak बैठकीत चांगलाच धुरळा उडणार आहे. राजकारणातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (12 ऑगस्ट) ‘मुंबई Tak बैठक’ पार पडणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दिग्गज नेत्याच्या मुलाखती.

मुंबई Tak बैठक मध्ये विधानसभा निवडणुकीसह महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा

follow google news

बातम्या हायलाइट

point

'मुंबई Tak बैठक'मध्ये महाराष्ट्राच्या विकासावर मंथन

point

विधानसभा निवडणूक आणि राजकारणावर चर्चा

point

मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक दिग्गज होणार सहभागी

Mumbai Tak Baithak: मुंबई: विधानसभा निवडणुकीचं रण आता पेटू लागलं आहे. युती-आघाडी यांच्यात जागावाटपावरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झालीए. या सगळ्या राजकीय रणधुमाळीत मुंबई Tak आपल्यासाठी घेऊन आलंय खास 'बैठक'. राजकारणातील दिग्गज नेत्यांची खुमासदार फटकेबाजी आणि त्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन हेच आपल्याला आज (12 ऑगस्ट) रोजी ‘मुंबई Tak बैठक’ (Mumbai Tak Baithak) मध्ये पाहायला मिळणार आहे. (mumbai tak baithak will be held on 12 august 2024 in the presence of maharashtra political dignitaries cm eknath shinde devendra fadnavis aditya thackeray supriya sule pankaja munde)

हे वाचलं का?

मुंबईमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार असून यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विशेष मुलाखती पार पडणार आहे. आज (12 ऑगस्ट) सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सगळ्या मुलाखती आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर LIVE पाहता येत.

'मुंबई Tak बैठक'मध्ये कोण-कोण येणार?

सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दुसरं सत्र पार पडणार आहे. 

त्यानंतर तिसरं सत्र हे महाराष्ट्रातील आरक्षण आणि त्या भोवतालची परिस्थिती यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण या सत्रात राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे आपली मतं व्यक्त करतील.

हेही वाचा >> "तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही", भाजपचा ठाकरेंवर हल्ला 

तर चौथं सत्र हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असणार आहे. कारण या सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन राज्यासमोर मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीची झालेली पडझड आणि राजकीय घडामोडी या सगळ्याचा उहापोह या सत्रात होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत पार पडेल. ज्यामध्ये ते महाराष्ट्रातील राजकारणा संपूर्ण पट आपल्यासमोर मांडतील.

हेही वाचा >> भारतात खळबळ! "सेबी अध्यक्षांच्या परदेशात बनावट कंपन्या; अदाणी समूहाशी संबंध" 

सहावं सत्र हे अधिक विशेष असणार आहे. कारण त्यात स्वत: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे हे सहभागी होणार आहे. ठाकरे सरकार कोसळल्यापासून थेट रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणारे आदित्य ठाकरे हे आगामी राजकारण कसं करणार याची झलक आपल्याला मुंबई Tak बैठकीत पाहायला मिळेल. 

प्रकाश आंबेडकर, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेशी राजकीय गप्पा

मुंबई Tak च्या प्रेक्षकांना 12 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी दिग्गज नेत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासारखे दिग्गजही मुंबई Tak बैठकीत सहभागी होणार आहेत.

अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकरांची जोडी 'मुंबई Tak बैठक'मध्ये

मुंबई Tak बैठकीची सुरुवात ही जरी राजकीय नेत्यांच्या फटकेबाजीने होणार असली तरीही त्याचा समारोप हा अवघ्या महाराष्ट्राला आपलंस करून सोडणाऱ्या दिग्गज मराठी अभिनेत्यांच्या खुमसदार गप्पांनी होणार आहे. ‘मुबई Tak बैठक’मध्ये सिने क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे सहभागी होणार आहेत. तर त्यांच्याच बरोबर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर हे देखील आपल्याशी गप्पा मारतील. तर या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या जोडीला अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि अभिनेता स्वप्निल जोशी देखील असणार आहे.

'मुंबई Tak बैठकी'चा हा भरगच्च कार्यक्रम अजिबात चुकवू नका.. पाहा

 

    follow whatsapp