Mhada Lottery documents : म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 'ही' कागदपत्रे हवीच!

मुंबई तक

10 Aug 2024 (अपडेटेड: 10 Aug 2024, 04:58 PM)

Mhada Lottery 2024 Mumbai Required Documents : मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत.

मुंबई म्हाडा लॉटरी २०२४ साठी कोणती कागदपत्रे असायला हवीत?

म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडा लॉटरी २०२४ मुंबई

point

म्हाडा लॉटरी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

point

विवाहित अर्जदाराकडे कोणती कागदपत्रे हवीत?

Mhada Lottery 2024 documents : म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा अखेर संपली. 2030 प्लॅटसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात आली असून, 9 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. नावनोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे नसतील, तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत, हे समजून घ्या... (Documents Required for Mhada Lottery 2024 Mumbai)

हे वाचलं का?

म्हाडाने मुंबईतील घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरताना काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागतील.

हेही वाचा >> 1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं? 

म्हाडा लॉटरीसाठी ही कागदपत्रे हवी

- मोबाईल क्रमांक (आधार कार्ड सलग्नित)
- ईमेल 
- आधार कार्ड नंबर
- पॅन कार्ड नंबर
- पत्नीचे आधार कार्ड (विवाहित असल्यास)
- पत्नीचे पॅन कार्ड (विवाहित असल्यास)
- रहिवासी प्रमाणपत्र
- आयटीआर (स्वतःचे)
- आयटीआर (पत्नीचे)
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- विशेष आरक्षित प्रवर्ग

म्हाडा अर्ज भरताना ही काळजी घ्या

आधार कार्डचा फोटो स्पष्ट असावा. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि आधार कार्डवरील जन्मतारीख अचूक आणि स्पष्ट असावी. त्याचबरोबर पुढील व मागील फोटो असावा.

हेही वाचा >> मुंबईतील घराचं स्वप्न होणार साकार; असा करा अर्ज 

रहिवासी प्रमाणपत्राचा फोटोही स्पष्ट असावा. पाच वर्षांपेक्षा जास्त जुने नसावे. त्यावर बारकोड असावा. 

उत्पन्नाचा दाखला चालू आर्थिक वर्षाचा असावा. त्याचबरोबर त्यावरील बारकोड आणि उत्पन्न स्पष्ट असावे.

हेही वाचा >> "सुपाऱ्या फेकणारे 100 टक्के शिवसैनिक असतील, पण...", राऊतांचा खुलासा 

आयकर परतावा प्रमाणपत्राचा फोटो स्पष्ट असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र अलिकडील आर्थिक वर्षाचे असावे. पोचपावती क्रमांक, वर्ष, उत्पन्न स्पष्ट दिसायला हवे. 

विशेष आरक्षित प्रवर्गातून अर्ज करताना त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया म्हाडा वेबसाईटवर तुम्हाला मिळेल.

म्हाडा लॉटरी कुठे आहेत घरे?

मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रक्कम ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्विकारली जाणार आहे.

    follow whatsapp