Mumbai weather forecast : पुढील 24 तासांत मुंबई आणि मुंबई उपनगर तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत तुफान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १५ आणि १६ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. (The Indian Meteorological Department has predicted that Mumbai, Thane and Palghar districts will experience heavy to very heavy rainfall on July 15)
ADVERTISEMENT
मुंबईसाठी 24 तास महत्त्वाचे
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. त्याबरोबर १६ जुलै रोजी पाऊस आणखी वाढण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हेही वाचा >> "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले
पालघर, ठाण्यालाही पाऊस झोडपणार
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे सोमवारी (15 जुलै) पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळेल. त्याचबरोबर पावसाचा जोर वाढेल, असेही हवामान विभागाने म्हटले असून, दोन्ही जिल्ह्यांना १६ जुलै ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोकणाला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने कोकणातील रायगडला ऑरेंज अलर्ट दिला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.
हेही वाचा >> 'महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
पावसाचा जोर वाढल्यास लोकलचा वेग मंदावण्याची शक्यता
मुंबईत रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला तर सोमवारी सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेचा वेग मंदावू शकतो. महत्त्वाचं म्हणजे कोकण रेल्वेला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वे मार्गावर भूस्खलन
कोकण रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. करंजाडी-विन्हेरे दरम्यान ही भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या गाडी क्रमांक 50103 दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरीकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात पावसाने हाहाकार केला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने दरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे रस्ते सेवा आणि रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
ADVERTISEMENT