Worli Accident : "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं?

मुंबई तक

07 Jul 2024 (अपडेटेड: 07 Jul 2024, 05:04 PM)

Worli Hit and Run : वरळीतील अटरिया मॉलजवळ भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. कारचालकाने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेले. नेमकं काय घडलं, हे सांगताना कावेरी नाकवा यांचे पती ढसाढसा रडले. 

मिहीर शाह हा फरार असून, कावेरी नाकवा यांच्या पतीने सगळा घटनाक्रम सांगितला.

कावेरी नाकवा यांचे पती प्रदीप नाकवा आणि फरार असलेला मिहीर शाह.

follow google news

बातम्या हायलाइट

point

वरळीत बीएमडब्ल्यू कारची दुचाकीला धडक

point

शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह फरार

point

प्रदीप नाकवा यांनी सांगितले कसा झाला अपघात, कोण चालवत होतं गाडी?

Mihir Shah Worli Hit and Run case : मुंबईतील वरळी भागात राजेश शाह यांच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कारचालकाने सी लिंकपर्यंत महिलेला फरफटत नेले. यात महिलेचा मृत्यू झाला. कावेरी नाकवा यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असूनू, त्यांच्या पतीने नेमकं काय घडलं, याबद्दलचा सगळा घटनाक्रम सांगितला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात घडला त्यावेळी राजेश शाह यांचा मुलगा कार चालवत होता. (Worli Hit and run Case : BMW car allegedly driven by Mihir shah rams into bike, women died on the spot)

हे वाचलं का?

जखमी कावेरी नाकवा यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कावेरी नाकवा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आघात झाला असून, त्यांचे पती प्रदीप नाकवा यांनी अपघाताचा सगळा घटनाक्रम सांगितला.

Worli Accident Updates : अपघात कसा घडला?

माध्यमांशी बोलताना प्रदीप नाकवा म्हणाले की, "आमचा मासेमारीचा धंदा बंद असतो म्हणून आम्ही दोन महिने उदरनिर्वाहासाठी बाजारातून मासे आणून विकतो. मनीष मार्केटमधून... दररोजच्या सारखे आम्ही तिथे गेलो होतो. येताना आम्ही ३० ते ३५ च्या स्पीडने येत होतो."

हेही वाचा >> खासदार वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण 

"येताना आम्ही जास्त स्पीडने येत नाही कारण मच्छिचा लोड असतो. पण, त्या माणसाने असं केलं की विसरूच नये. त्याने पाठीमागून अशी धडक दिली की, आम्ही त्याच्या बोनेटवर पडलो", असे प्रदीप नाकवा यांनी सांगितले.  

Mumbai Hit And Run : "माझी बायको चाकाखाली आली"

"बोनेटवर पडल्यावर आम्ही त्याला थांब... थांब बोलतोय, तरी त्याने गाडी थांबवली नाही. त्याने ब्रेक मारला तर मी डाव्या बाजूला खाली पडलो. आणि माझी बायको चाकाखाली आली. त्याला थांब थांब करत होतो. त्याने सीजे हाऊसकडून तिला सी लिंकपर्यंत फरफटत नेली हो. काय करू सांगा? माझी दोन पोरं पोरकी झाली. कोणी नाहीये हो", असे सांगताना प्रदीप नाकवा ढसाढसा रडत होते.

हेही वाचा >> Mazi ladki bahin yojana online form : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज!  

गाडी कोण चालवत होतं? असं विचारलं असता प्रदीप नाकवा म्हणाले की, "एक सडपातळ मुलगा होता. त्याचे नाक उभट होतं. त्याला थोडी दाढी होती. केस वरती होते. त्याला मी स्वतः बघितलं." 

"गाडीमध्ये आणखी एक माणूस होता"

"आम्ही जेव्हा पडलो, तेव्हा डाव्या बाजूला पडलो. तेव्हा मी त्याला थांब... थांब म्हणत हात मारला. त्याने ब्रेक मारला तर मी परत पाठीमागे आलो. त्याच्यासोबत गाडीत बाजूला बसलेला होता. पण, गाडीची काच फुटल्यामुळे तो दिसला नाही", असेही प्रदीप नाकवा यांनी सांगितले.

हेही वाचा >> एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत?

"त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. माझी बायको आता काही परत येणार नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी", अशी मागणी कावेरी नाकवा यांच्या पतीने केली आहे. 

    follow whatsapp