Worli Hit and Run : मुंबईत हिट अँड रनचा आणखी एक बळी! 'बीएमडब्ल्यू'च्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 08:09 AM)

Worli hit and run latest news : वरळी सी फेस जवळ एका बीएमडब्ल्यू कारने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला.

वरळीत बीएमडब्ल्यू कारने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत हिट अँड रनची दुसरी घटना

point

28 वर्षीय तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू

point

डिसेंबरमध्ये होणार होते लग्न

Worli Hit and Run News : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाच्या गाडीला सुसाट जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तरुण जोरात जाऊन पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. (28 year old youth died after BMW car hits two wheeler in Mumbai)

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी कावेरी नाखवा या महिलेचा कारने फरफटत नेल्याने मृत्यू झाला होता. त्याच घटना स्थळापासून काही अंतरावर 20 जुलै रोजी दुसरी घटना घडली. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. विनोद लाड (वय 28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तरुणाचा मृत्यू, वरळीत काय घडलं?

वरळी सी फेसजवळ ए.जी. खान अब्दुल खान गफार खान मार्गावरून विनोद लाड हा कामावरून घरी जात होता. याच वेळी विनोदच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या बीएमडब्ल्यू कारने जोराची धडक दिली.

हेही >> 15 वर्षाची असताना अत्याचार; यशश्रीचा हालहाल करून घेतला जीव!  

धडक इतकी जोरात होती की, विनोद खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विनोद खाली पडल्यानंतरही बीएमडब्ल्यू कार थांबली नाही. पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कारच्या चालकाने जखमी झालेल्या विनोदला रुग्णालयात दाखल केले. 

उपचार सुरू असतानाच झाला मृत्यू 

जखमी विनोद लाड याच्यावर अतिदक्षता विभागात सात दिवस उपचार सुरू होते. 27 जुलै रोजी विनोदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

डिसेंबरमध्ये होते विनोदचे लग्न

हिट अँड रनच्या घटनेत मृत्यू झालेला विनोद लाड हा मूळचा मालवणचा रहिवासी होता. ठाण्यातील एक खासगी वाहतूक कंपनीत तो नोकरी करत होता. 

विनोद लहान असतानाच त्याचे आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विनोदने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी करू लागला होता. हिल रोड येथील चुलत बहिणीकडे तो राहायला होता.

हेही >> ''अजित दादांसारख्या व्यक्तीमत्वाला तोंड लपवून...'', ठाकरेंच्या नेत्याची बोचरी टीका 

विनोदचे लग्न ठरले होते. डिसेंबरमध्ये त्याचे लग्न होणार होते. त्याची तयारीही सुरू झाली होती. विनोदने मंगळसूत्र, अंगठीही खरेदी केली होती. अंगाला हळद लागण्याआधीच विनोदला मृत्यूने गाठले. 
 

    follow whatsapp