मोठी बातमी! अमरावतीत एक दिवसाचा लॉकडाऊन

मुंबई तक

• 12:43 PM • 18 Feb 2021

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अमरावतीमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे असं शैलेश नवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं नवाल यांनी म्हटलं आहे. तसंच […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अमरावतीमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे असं शैलेश नवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं नवाल यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन लोकांनी करावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच रिक्षामध्ये दोन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी आणि चारचाकीमध्ये चार पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. जर हा नियम पाळला गेला नाही तर दंडात्मक कारवाई होईल असंही स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

हे पण वाचा- चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर

अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा या तिन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि दोघांचा मृत्यू झाला. 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि चार जणांचा मृत्यू झाला तर 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण पॉझिटिव्ह होते. 17 तारखेला म्हणजेच काल 498 रुग्ण आढळले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबद्दल काय म्हटलं आहे पाहा मुंबई तकचा व्हीडिओ

अकोल्यातही निर्बंध

अकोल्यातही रुग्णसंख्या वाढू लागल्याने तिथेही आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. कोविड नियमांचं काटेकोर पालन करा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर यांनी दिले आहेत. अकोल्यातही शनिवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत एक दिवसाचा लॉकडाऊन लावण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp