Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आज त्यांच्या पहिली यादीची घोषणा केली आहे. 44 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी यादी वाचून दाखवली आहेत. या यादीत कुणाला कुणाला तिकीट मिळालं आहे. हे जाणून घेऊयात
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची सत्ता मिळविण्याासाठी शरद पवार हे वयाच्या 84 व्या वर्षी देखील राज्य पिंजून काढत आहेत. एकीकडे पक्ष आणि चिन्ह गेलेलं असताना देखील नाउमेद न होता शरद पवार यांनी आपले झंझावाती दौरे सुरूच ठेवले आहेत. तसंच अनेक ठिकाणची राजकीय गणित लक्षात घेऊन आता आपले उमेदवार त्या-त्या ठिकाणी दिले आहेत.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : बीडमध्ये भाजपला मोठा झटका, 'हा' नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या वतीने पहिल्या यादीत ... जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे दिग्गज आमदारांनी साथ सोडलेली असताना देखील शरद पवार यांनी नेत्यांची नवी फळी उभारत त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये जागांवरून ताणाताणी सुरू असताना शरद पवार यांनी मात्र संयमी भूमिका घेत त्यांची रणनीती आखली आहे.
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 (NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidates List)
- इस्लामपूर - जयंत पाटील
- काटोल - अनिल देशमुख
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
- घणसावंगी -राजेश टोपे
- मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव-शशिकांत शिंदे
- वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
- इंदापूर - हर्षवर्धन पाटील
- राहुरी - प्राजक्ता तनपुरे
- शिरूर - अशोक पवार
- शिराळा - मानसिंग नाईक
- विक्रमगड- सुनील भूसारा
- कर्जत जामखेड- रोहित पवार
- अहमदपूर- विनायक पाटील
- सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे
- उदगीर - सुधाकर भालेराव
- भोकरदन - चंद्रकांत दानवे
- तुमसर : चंद्रकांत वाघमारे
- किनवट- प्रदीप नाईक
- जिंतूर - विजय भांबळे
- केज - पृथ्वीराज साठे
- बेलापूर- संदीप नाईक
- वडगाव शेरी- बापूसाहेब पाठारे
- जामनेर- दिलीप घोडपे
- मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
- मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
- तिरोडा - रविकांत बोपचे
- अहेरी - भाग्यश्री आत्राम
- बदनापूर - रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
- मुरबाड - सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व - राखी जाधव
- आंबेगाव - देवदत्त निकम
- बारामती - युगेंद्र पवार
- कोपरगाव -संदीप वरपे
- शेवगाव - प्रताप ढाकणे
- पारनेर - राणी लंके
- आष्टी - मेहबूब शेख
- करमाळा - नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
- चिपळूण - प्रशांत यादव
- कागल - समरजीतसिंह घाटगे
- तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
- हडपसर- प्रशांत जगताप
अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवारांचा झंझावात
2023 साली अजित पवार यांनी पक्षात मोठं बंड केलं. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देखील मिळवलं. मात्र, असं असताना देखील शरद पवार यांनी त्यांच्या विशिष्ठ शैलीत राजकारणाला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हा नवा पक्ष आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह घेत पवारांनी त्यांचे राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली. ज्याचा फायदाही त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला.
हे ही वाचा>> Anil Deshmukh Book : '...नाहीतर घरातल्या महिलांनाही चौकशीला बोलवू', देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला चांगलं यश
दरम्यान, अजित पवार आणि अनेक आमदारांनी साथ सोडलेली असताना देखील शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी लोकसभेच्या केवळ 10 जागाच लढविल्या होत्या. मात्र, त्या 10 पैकी तब्बल 8 जागांवर पवारांचे उमेदवार जिंकून आले. तसंच बारामतीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यातही पवारांना यश आलं.
यामुळेच शरद पवारांच्या पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी इनकमिंग हे सुरू झालं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासमोर शरद पवारांनी मोठं आव्हान उभं केलं आहे.
ADVERTISEMENT