Ind vs NZ : वॉशिंग्टन सुंदरचा न्युझीलंडला 'गुलीगत धोका', एका इनिंगमध्ये घेतले तब्बल 'इतके' विकेट

मुंबई तक

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 05:33 PM)

Ind vs NZ, Washington Sundar : भारत आणि न्युझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात वॉशिंग्टनने सुंदर गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजीमुळे न्युझीलंडचा संघ पहिल्याच दिवशी 259 धावांवर ऑल आऊट झाला आहे.

washington sundar take 7 wicket inest india vs new zealand team india ind vs nz

वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी

follow google news

बातम्या हायलाइट

point

वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी

point

न्युझीलंडविरूद्ध सामन्यात 'इतके' विकेट घेतले

point

न्युझीलंडचा संघ पहिल्याच दिवशी 259 धावांवर ऑल आऊट

Ind vs NZ, Washington Sundar : भारत आणि न्युझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात वॉशिंग्टनने सुंदर गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजीमुळे न्युझीलंडचा संघ पहिल्याच दिवशी 259 धावांवर ऑल आऊट झाला आहे.सुंदरच्या गोलंदाजीपुढे न्युझीलंडचा एकाही खेळाडूचा निभाव लागला नाही. आणि एकामागून एक खेळाडू आऊट झाले आहेत. (washington sundar take 7 wicket inest india vs newzealand team india ind vs nz)  

हे वाचलं का?

न्युझीलंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्युझीलंडकडून टॉम लेथम आणि डेवॉन कॉन्वे ही जोडी प्रथम फलंदाजीस उतरली होती. यावेळी अश्विनने टॉम लेथमच्या रूपात टीम इंडियाला पहिला विकेट मिळवून दिला होता. लेथम 15 धावावर बाद झाला. त्यानंतर दुसरी आणि तिसरी विकेट देखील अश्विननेच घेतली. कॉन्वे आणि यांग या दोन्ही खेळाडूंना अश्विनने आऊट केले होते. 

हे ही वाचा : Prithvi Shaw चा खेळ खल्लास! मुंबईच्या स्टार फलंदाजाला रणजी ट्रॉफीतून का वगळलं? धक्कादायक कारण आलं समोर

न्यूझीलंडचे हे तीन विकेट पडल्यानंतर वॉशिग्टनच्या रूपात आलेल्या वादळाने एकाही खेळाडूला मैदानात टीकू दिले नाही. वॉशिंग्टनने एकामागून एक 7 विकेट घेतल्या. या सातपैकी तीन खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले तर बाकी चार खेळाडू एकेरी धावसंख्या करून आऊट झाले. 

अश्विनने सुरूवातीला न्युझीलंडला तीन धक्के देल्यानंतर रचिन रविंद्रने मैदानात उतरून डाव सावरला होता. त्याच्यासोबत डेरी मिचेल हा खेळाडू मैदानात होतो. हे दोघेही फलंदाज डाव सांभाळत असताना वॉशिंग्टने रचिन रविंद्रला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर डेरि मेचेला एलबीडब्ल्यू करत विकेट घेतला. वॉशिंग्टनने या दोघांना माघारी धाडल्यानंतर न्युझीलंडचा डाव चांगलाच गडगडला. एका मागून एक खेळाडू आऊट होत गेले. 

हे ही वाचा : कसोटीत सर्फराज खाननं ठोकलं पहिलं शतक! 16 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार...'असा' Video कधी पाहिला नसेल

मिचेल सॅटनरने नंतर एकाएकी झूंज देण्याचा प्रयत्न केला. पण वॉशिग्टनसमोर त्याचाही निभाव लागला नाही आणि तो देखील 33 धावांवर क्लिन बोल्ड झाला. बाकी इतर चार खेळाडू फक्त एकेरी धावसंख्या करून आऊट झाले. अशाप्रकारे सुंदरने या सामन्यात 7 विकेट घेतले आहे. त्याच्या आयुष्यातला हा टेस्टमधला बेस्ट स्पेल आहे. त्यांच्या या गोलंदाजीचे आता कौतुक होतं आहे. 

हे ही वाचा....Maharashtra Assembly Election 2024|

    follow whatsapp