वर्धा नदीत बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला. या 11 मधले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. अमरावती येथील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी 10 वाजता ही घटना घडली, यानंतर नदीत बुडालेले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे इतर 8 मृतदेहांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातले 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी संध्याकाळी दशक्रिया विधी झाला. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरूडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून होडीने जात होते. मात्र होडी उलटली आणि 11 जणांना जलसमाधी मिळाली.
अमरावती आणि नागपूरच्या मधोमध वर्धा नदी आहे. याच ठिकाणी झुंज नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात. तसेच आजही 11 जण नावेतून जात होते. मात्र त्याचवेळी ही दुर्घटना घडली. 11 जणांना या घटनेत जलसमाधी मिळाली. आमचं बचावकार्य या भागात सुरू आहे. महसूल विभाग, पोलीस यांची पथकं, बचाव पथकं अशी सगळी दाखल झाली आहेत. मात्र दुर्घटनेतल्या कुणालाही वाचवता आलेलंन नाही. मोर्शी विधानसभा क्षेत्राचे आमदार देवेंद्र भुयार यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
ADVERTISEMENT