चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात एका चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातात ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एक महिला ठार झाली असून जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार ओडीसावरुन करीमनगरच्या दिशेने हे वाहन जात असताना आकापूर जवळील वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली. या मार्गावर दिशादर्शक चिन्ह लावण्यात आलेली नसल्यामुळे अनेक चालकांना गाडी चालवताना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
ओडीसा येथील महिला कामगार पुतना गजपती धरोहा हिचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्गावरचे काम गेले काही दिवस सुरुच असल्यामुळे या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT