विद्येच्या माहेरघरात कोवळ्या कळ्या असुरक्षित, पुण्यात ११ वर्षांच्या मुलीवर शाळेतच बलात्कार

मुंबई तक

• 06:50 AM • 24 Mar 2022

विद्येचं माहेरघर ही पुण्याची ओळख. मात्र याच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका शाळेत अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. याआधी वडगावशेरी या ठिकाणी एका मुलीवर चाकू हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता शिवाजी नगरमधल्या एका शाळेत ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

विद्येचं माहेरघर ही पुण्याची ओळख. मात्र याच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका शाळेत अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. याआधी वडगावशेरी या ठिकाणी एका मुलीवर चाकू हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता शिवाजी नगरमधल्या एका शाळेत ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे वाचलं का?

Rape Case: बीड जिल्हा हादरला, वासनांध 23 वर्षीय तरुणाचा 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर भागात असलेल्या एका शाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही मुलगी शाळेत होती. त्यावेळी तिथे ४० वर्षांचा एक अज्ञात व्यक्ती आला. या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला शाळेच्या बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर तू कुणाला काही सांगितलंस तर तुला बघतोच अशी धमकीही या व्यक्तीने पीडित मुलीला दिली.

लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबीयांना हा सगळा प्रकार सांगितला. या मुलीने दिलेल्या माहितीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीकडून आणखी माहिती घेण्यात येते आहे. तसंच आरोपीचा शोध शिवाजी नगर पोलिसांनी सुरू केला आहे.

    follow whatsapp