Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ! पण अजितदादा म्हणाले, "काहींना अडीच वर्षांसाठी..."

मुंबई तक

15 Dec 2024 (अपडेटेड: 15 Dec 2024, 08:20 PM)

Ajit Pawar On Maharashtra Cabinet Expansion: आज नागपूरच्या राजभवनात महायुतीच्या एकूण 39 नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (फाइल फोटो)

अजित पवार

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पडला पार

point

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ!

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाची होतेय सर्वत्र चर्चा

Ajit Pawar On Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच आज नागपूरच्या राजभवनात महायुतीच्या एकूण 39 नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील,बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक (राज्यमंत्री) या नेत्यांचा समावेश आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्यादरम्यान मोठं विधान केलं आहे. 

हे वाचलं का?

काय म्हणाले अजित पवार?

"मागच्या वेळेस आपण सरकारमध्ये गेलो तेव्हा काहींना दिड वर्षांची कारकीर्द मिळाली. आता पाच वर्षांच्या कारकीर्दीत आम्ही असं ठरवलं आहे की काहींना आडीच वर्षांसाठी संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना प्रतिनिधित्व मिळेल. याबाबत आमच्या तिघांमध्येही एकवाक्यता झाली आहे, अशी मोठी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. 

हे ही वाचा >> Raj-Uddhav Meeting : राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? समोर आली मोठी अपडेट

हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री

  1. हसन मुश्रीफ
  2. धनंजय मुंडे
  3. दत्तात्रय भरणे
  4. आदिती तटकरे
  5. माणिकराव कोकाटे
  6. नरहरी झिरवाळ
  7. मकरंद पाटील
  8. बाबासाहेब पाटील
  9. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

हे ही वाचा >> Ambadas Danve "...म्हणून महाविकास आघाडीने सरकारच्या चहापाण्यावर घातला बहिष्कार, अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितलं

आज 15 डिसेंबरला नागपूरमध्ये राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये कोकण विभागात 6, मुंबई-ठाणे-4, विदर्भ - 7, उत्तर महाराष्ट्र - 8, पश्चिम महाराष्ट्र - 9 तर मराठवाड्यासाठी ६ मंत्रिपदे मिळाली आहेत. 

    follow whatsapp