लातूरमध्ये बारावीत शिकणाऱ्या तरूणाची कोयत्याचे वार करून दिवसाढवळ्या हत्या

मुंबई तक

• 05:51 AM • 24 Jan 2022

लातूरमध्ये बारावीच्या तरूणाची कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली आहे. रोहन उजळबे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. भरवस्तीत त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विशाल नगर भागातल्या साईबाबा मंदिराजवळ ही थरारक घटना घडली आहे. रोहन उजळबे हा तरूण या ठिकाणाहून चालत होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने […]

Mumbaitak
follow google news

लातूरमध्ये बारावीच्या तरूणाची कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली आहे. रोहन उजळबे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. भरवस्तीत त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विशाल नगर भागातल्या साईबाबा मंदिराजवळ ही थरारक घटना घडली आहे.

हे वाचलं का?

रोहन उजळबे हा तरूण या ठिकाणाहून चालत होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे चौकशी केली. काही कळायच्या आतच रोहनच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे रोहनच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रोहन उजळबे या बारावीत शिकणाऱ्या तरूणाची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटना घडताच MIDC पोलीस ठाण्यातले पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. यामागे कोण आहे? रोहनची हत्या नेमकी का करण्यात आली? या सगळ्या घटनांचा पोलीस कसून तपास करत आहेत. रोहनच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या टीमही रवाना केल्या आहेत.

लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (२०) हा मुळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, विशाल नगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो थांबवला होता. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. काही समजायच्या आतच मारेकरी मोटरसायकलवरुन पासर झाल्याचे प्रत्यक्षर्शींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    follow whatsapp