महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे. दररोज 60 हजार ते 67 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. अशात महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमधलं चित्र आशादायी ठरलं आहे. कारण हे 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रूग्ण वाढणाऱ्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त आहेत. उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधलं चित्र कोरोनाच्या अंधारातला आशेचा किरण ठरत आहेत.
ADVERTISEMENT
कोणते आहेत हे 15 जिल्हे ?
१) मुंबई
२) पुणे
३) ठाणे
४) नाशिक
५) बीड
६) नांदेड
७) नागपूर
८) भंडारा
९) अहमदनगर
१०) धुळे
११)नंदुरबार
१२) जळगाव
१३) परभणी
१४) हिंगोली
१५) सिंधुदुर्ग
या पंधरा जिल्ह्यांमध्ये रूग्ण बरे होण्यांचं प्रमाण हे पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रासाठी ही नक्कीच समाधानाची बाब ठरली आहे.
२५ एप्रिलला आलेल्या कोरोना अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात किती संख्या पॉझिटिव्ह रूग्णांची होती आणि किती रूग्ण बरे झाले ते पाहुयात.
मुंबई
पॉझिटिव्ह रूग्ण 5542
बरे झालेले रूग्ण – 8 हजार 478
पुणे
पॉझिटिव्ह रूग्ण 4631
बरे झालेले रूग्ण 4759
ठाणे
पॉझिटिव्ह रूग्ण 1054
बरे झालेले रूग्ण 1495
नाशिक
पॉझिटिव्ह रूग्ण – 2727
बरे झालेले रूग्ण- 2931
बीड
पॉझिटिव्ह रूग्ण – 1237
बरे झालेले रूग्ण- 1034
अहमदनगर
पॉझिटिव्ह रूग्ण – 3553
बरे झालेले रूग्ण- 3493
धुळे
पॉझिटिव्ह रूग्ण – 204
बरे झालेले रूग्ण- 490
हिंगोली
पॉझिटिव्ह रूग्ण –
बरे झालेले रूग्ण –
नांदेड
पॉझिटिव्ह रूग्ण – 1105
बरे झालेले रूग्ण- 1276
जळगाव
पॉझिटिव्ह रूग्ण – 1097
बरे झालेले रूग्ण- 1070
ऩंदुरबार
पॉझिटिव्ह रूग्ण – 214
बरे झालेले रूग्ण- 808
परभणी
पॉझिटिव्ह रूग्ण – 639
बरे झालेले रूग्ण – 1172
भंडारा
पॉझिटिव्ह रूग्ण – 1238
बरे झालेले रूग्ण- 1368
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
या प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपेक्षा रिकव्हरी होण्याचं प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. उर्वरित 21 जिल्हे असे आहेत जिथे मात्र कोरोना रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रासाठी ही बाब चिंतेची आहे. तरीही दुसऱ्या लाटेतून आपण नक्कीच बाहेर पडू असा विश्वास प्रशासनाने आणि राज्य सरकारने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात 1 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. कदाचित हा लॉकडाऊन वाढण्याचीही शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही येत्या काही काळात कठोर निर्बंधामुळे महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
ADVERTISEMENT