हरिद्वारमध्ये 12 वर्षांनी भरलेला कुंभमेळा हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरणार यात काही शंकाच नाही. कारण मागील पाच दिवसात या ठिकाणी 1701 केसेस पॉझिटिव्ह आल्या आहेत. कुंभमेळ्यातल्या पवित्र स्नानासाठी लाखो लोक रोज गर्दी करत आहेत. उत्तराखंडच्या आरोग्य विभागानेच ही संख्या दिली आहे. RTPCR आणि अँटिजन टेस्ट या दोन्हीचे मिळून 1701 नमुने पॉझिटिव्ह ठरले आहेत. आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जातो आहे. अशात उत्तराखंडमध्ये कुंभमेळा भरला आहे. या कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी साधू गर्दी करत आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसात 1701 Corona नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
कोरोना महामारीच्या काळातच कुंभमेळा आला आहे. या कुंभमेळ्याला लाखो भाविकांची स्नानासाठी गर्दी होते आहे. शाही स्नानही पार पडलं आहे. शैव आणि वैष्णव पंथियांचा मेळा या ठिकाणी येत असतो. हरिद्वारमध्ये कोरोनाची चाचणीही केली जात नाहीये तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळेच 1701 जण गेल्या पाच दिवसांमध्ये पॉझिटि्व्ह झाले आहेत. आणखी काही चाचण्यांचे निकाल येणं बाकी आहे अशी माहिती हरिद्वारचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा यांनी इंडिया टुडेला दिली आहे.
कोव्हिड प्रोटोकॉलचेही तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरणार यात काहीही शंका दिसत नाहीये. एकीकडे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जातो आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. दिल्लीत वीक एन्ड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात साधू कुंभमेळा साजरा करत आहेत.
कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं
आत्ता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार लाखो लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं आहे. कुंभमेळा ज्या भागात साजरा होतो आहे तो भाग 670 हेक्टरमध्ये पसरला आहे. 12 आणि 14 एप्रिल या दोन दिवशी शाही स्नान होतं. या दोन दिवसात सुमारे 48 लाख लोकांनी स्नान केलं आहे. आम्ही RTPCR आणि अँटिजन टेस्ट करत आहोत अशी माहिती झा यांनी दिली आहे.
एकीकडे देशभरात कोरोना चांगलाच वाढतो आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंग, कोरोना प्रतिबंधाचे नियम, मास्क लावणे, हात धुणे या सगळ्या नियमांचे तीन तेरा वाजले आहेत. कुंभमेळा असल्याने या कुंभमेळ्यात जे कुणी स्नान करण्यासाठी येतील किंवा जी काही गर्दी होईल त्यामुळे कोरोना वाढू शकतो असं तज्ज्ञांनी आधीच सांगितलं होतं. तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
ADVERTISEMENT