देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. याचा परिणाम अनेक गोष्टींवर होतोय. अशातच एका डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमात जजची भूमिका साकारतेय. ‘डान्स दिवाने’ या डान्सच्या कार्यक्रमात जवळपास 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
सेटवरील 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याने इतर लोकांच्या मनात भितीचं वातावरण आहे. माधुरी दीक्षितसोबतच डान्सर धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया या शोमध्ये जज आहेत. डान्स दिवाने शोचा सध्या तीसरा सीझन सुरु आहे. या शोमध्ये बॅकस्टेजमध्ये काम करणाऱ्या 18 क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे.
या घटनेनंतर शोमधील सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या मेंबर्सना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेमुळे कार्यक्रमावर कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT