फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांवर तलवारीने प्राणघातक हल्ला करुन डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस भागात रविवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
शिवम शितकल आणि गणेश माखर अशी हत्या झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. याप्रकरणी महेश भागवत, मोहन टुले, योगेश शिंदे व अन्य ४-५ जणांवर हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम आणि गणेशला महेश भागवत याने फोनवरुन आई-बहिणीच्या नावाने शिव्या दिल्या. याबद्दल जाब विचारायला गेले असता तिघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांत मारामारीत झालं.
महेश भागवत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिवम आणि गणेशवर तलावारीने वार करत डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे दौंड भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान दौंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT