प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर पुतण्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या निमित्ताने गेली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पीडित महिलेचा पुतण्या हा तिच्या (चुलतीकडे) घराजवळ आला.
पीडित चुलतीला त्याने आवाज देऊन सांगितले की, नाना (पीडित महिलेचा पती) दारू पिऊन पडला आहे. माझ्यासोबत चल तुला दाखवतो, कुठे आहे ते. महिलेने पुतण्यावर विश्वास ठेवला आणि ती देखील त्याच्यासोबत गेली. यावेळी अंधार असल्याने त्याने महिलेला नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले आणि तिचे तोंड दाबून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढंच नव्हे तर यानंतर वासनांध पुतण्याने आपल्याच चुलतीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच बलात्काराविषयी कोणालाही सांगितले तर जीवे ठार मारू अशी धमकी त्याने तिला दिली.
यानंतर या पीडित महिलेने घडलेला सर्व प्रसंग घरी आल्यावर आरोपीची चुलती व त्याच्या आईला सांगितला. यावर त्यांनी सांगितले की, आपण लग्न घरी आहोत. तू आता गप्प बस. घरी गेल्यावर चर्चा करू.
दरम्यान, पीडित महिला घरी आल्यावर तिने सगळ्यात आधी घडलेला संपूर्ण प्रकार हा तिच्या नवऱ्याला सांगितला. ज्यानंतर तिच्या नवऱ्याने आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेत तात्काळ थेट घोटी पोलीस ठाणे गाठून आपल्या पुतण्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली.
पुणे: वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग
बलात्काराची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी पुतण्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित आरोपीने आपणच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणी घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे तपास करत असून याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल अशीही माहिती त्यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दिली.
ADVERTISEMENT