सहा वाहनं एकमेकांना धडकून मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

मुंबई तक

• 05:04 AM • 18 Oct 2021

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात खोपोली जवळील तीव्र उतारावर सहा वाहनं एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. या विचीत्र अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जणं गंभीर जखमी झाले आहेत. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील एकाचा तर स्विफ्ट गाडीत अडकलेल्या दोघांचा यात मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ज्यामुळे पुण्यावरुन […]

Mumbaitak
follow google news

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात खोपोली जवळील तीव्र उतारावर सहा वाहनं एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. या विचीत्र अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जणं गंभीर जखमी झाले आहेत. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील एकाचा तर स्विफ्ट गाडीत अडकलेल्या दोघांचा यात मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ज्यामुळे पुण्यावरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळासाठी विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पो चालकाचे तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे हा टेम्पो भाजीची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर जाऊन आदळला. यानंतर भाजीची वाहतूक करणारा टेम्पो कारवर आदळला.

टेम्पोच्या धडकेमुळे ही कार कोंबड्यांच्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. या धक्क्यामुळे कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो एका प्रवासी बसला जाऊन धडकला. या भीषण अपघातात कार ही ट्रेलर आणि टेम्पोमध्ये चिरडली गेली. ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जणं जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना व मृतांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर मार्गावरील अपघातग्रस्त वाहने ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.

थरकाप उडवणारा अपघात! वेगवान बाईक डिव्हायडरवर आदळली; तरुण-तरुणी जागीच ठार

    follow whatsapp