धक्कादायक ! जळगावात सेफ्टी टँक साफ करताना गाळात बुडून तीन कामगारांचा मृत्यू

मुंबई तक

• 01:04 PM • 15 May 2021

जळगावमध्ये केमिकल कंपनीचा सेफ्टी टँक साफ करत असताना गाळात बुडून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्याच्या दरम्यान MIDC मधील समृद्धी केमिकल कंपनीत हा प्रकार घडला. सर्वात आधी एक कामगार टँक साफ करत असताना या गाळात अडकला, त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोन कामगारही या गाळात अडकले…ज्यानंतर त्यांना बाहेर येता आलं नाही […]

Mumbaitak
follow google news

जळगावमध्ये केमिकल कंपनीचा सेफ्टी टँक साफ करत असताना गाळात बुडून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्याच्या दरम्यान MIDC मधील समृद्धी केमिकल कंपनीत हा प्रकार घडला. सर्वात आधी एक कामगार टँक साफ करत असताना या गाळात अडकला, त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोन कामगारही या गाळात अडकले…ज्यानंतर त्यांना बाहेर येता आलं नाही आणि त्यांचा जीव गेला.

हे वाचलं का?

मयूर सोनार, दिलीप सोनार आणि रविंद्र कोळी अशी मयत कामगारांची नावं आहेत. या तिघांचे मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

जळगावच्या MIDC परिसरात सेक्टर ए ८४/८५ मध्ये समृद्धी केमिकल नावाची कंपनी आहे. ही कंपनी सुबोध चौधरी यांच्या मालकीची असून या कंपनीत ऑरगॅनिक कॅटल फिडसाठी लागणारं रसायन बनवलं जातं. शनिवारी कंपनीतला सेफ्टी टँक साफ करण्यात येणार होता. यासाठी कंपनीचा कर्मचारी दिलीप सोनार मयूर सोनार आणि रविंद्र कोळी या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफ करण्याचं काम करत होता.

याचवेळी दोघांपैकी एक जण पाय घसरुन सात-आठ फूट खोल असलेल्या टँकमध्ये पडला. एकाला वाचवण्यासाठी जात असताना दुसरा कर्मचारीही या टँकमध्ये पडला. आपल्यासोबत काम करणारे दोघे जण आत अडकल्यानंतर रविंद्र कोळी हा देखील त्यांना वाचवण्यासाठी गेला, पण दुर्दैवाने तो देखील या गाळात फसला. या घटनेची माहिती मिळताच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी दोर आणि बांबुच्या सहाय्याने तिन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. ज्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिघांचीही तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे आणि MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु केलं आहे.

    follow whatsapp