60 year old maternal aunt’s heart fell on 42 year old nephew: शाहजहांपूर (उत्तर प्रदेश): एका मामीचा (aunt) आपल्याच भाच्यावर (nephew) जीव जडला होता. ज्यासाठी मामीने जे काही केलं त्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भाच्यावर मामीचा जीव जडलाय तो तब्बल 42 वर्षांचा आहे. तर मामीच वय 60 वर्ष आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) शाहजहांपूरमध्ये घडली आहे. (60 year old maternal aunts heart fell on 42 year old nephew broke marriage with fake marriage)
ADVERTISEMENT
भाचा आपल्याला मिळावा यासाठी मामीने एक अशी चाल खेळली की ज्यामुळे भाच्याचं मोठं स्वप्न भंगलं आहे. असा आरोप आहे की, मामीने बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केलं. ज्यानंतर मामीने भाच्याच्या सासरकडील लोकांच्या मोबाइलवर हे खोटं विवाह प्रमाणपत्र पाठवलं. ज्यामुळे भाच्याचे लग्न मोडलं. भाच्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मामीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.
Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!
शाहजहांपूर येथील रहिवासी असिफने तक्रार केली आहे की, ‘2 मार्च 2022 रोजी त्याच्या मामाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. तो कपड्यांचे दुकान चालवत होता. त्यानंतर मामी माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. कारण मामीचा माझ्या संपत्तीवर डोळा आहे. पण जेव्हा मी लग्नास नकार दिला त्यानंतर म्हणजे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मामीन तिच्या दोन मुलं व सुनांसह माझ्या घरात घुसून तोडफोड केली.’ असं असिफने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
28 डिसेंबरला होणार होता आसिफचा विवाह
फिर्यादीत म्हटले आहे की, आसिफचा विवाह 28 डिसेंबर रोजी होणार होता, मात्र त्याच्या 5 दिवस आधी मामी मुलीकडील कुटुंबीयांना बनावट विवाह प्रमाणपत्र पाठवले. यामुळे त्याचे लग्न मोडले. आसिफची वकील उपमा भटनागर सांगतात की, हे प्रकरण ब्लॅकमेलिंगचे आहे, जे मालमत्तेशी देखील संबंधित आहे.
आसिफचं लग्न हे जवळजवळ वर्षभरापासून ठरलं होतं. त्यासंबंधी घरात अनेक कार्यक्रमही झाले होते. पण जेव्हा लग्नाची तारीख जाहीर झाली तेव्हा आसिफच्या मामीने मुलीकडील लोकांना व्हॉट्सअॅपवर बनावट विवाह प्रमाणपत्र पाठवलं.
Amboli : मृतदेह फेकताना स्वतःच दरीत पडला… आंबोलीच्या घाटात काय घडलं?
लग्नाच्या विवाह प्रमाणपत्रावर आसिफची सही नव्हती – वकील
आसिफच्या वकिलाने सांगितले की, निकाहनाम्यावर असिफची सही नाही किंवा साक्षीदाराचीही सही नाही. दुसरीकडे, सीओ सिटी अखंड प्रताप यांचे म्हणणे आहे की, एका 60 वर्षीय महिलेने आपल्या भाच्याचा निकाहनामा भाच्याकडील सासरकडील लोकांना पाठवले ज्यामुळे भाच्याचे लग्न मोडले.
याप्रकरणी पीडित असिफने फिर्याद दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण मालमत्तेशी संबंधित आहे. मामीला संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर असावी असे वाटते. याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT