लखीमपूर हिंसाचार : हा हिंसाचार पाहूनही शांत राहणारी लोकं आधीच मेलेली आहेत – राहुल गांधी

मुंबई तक

• 05:22 PM • 03 Oct 2021

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या भागात बंदोबस्तात वाढ केलेली असली तरीही काँग्रेससह सर्वच प्रमुख विरोधी पक्ष यानिमीत्ताने उत्तर प्रदेश सरकारवर तुटून पडले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत, हा नरसंहार पाहिल्यानंतरही […]

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या भागात बंदोबस्तात वाढ केलेली असली तरीही काँग्रेससह सर्वच प्रमुख विरोधी पक्ष यानिमीत्ताने उत्तर प्रदेश सरकारवर तुटून पडले आहेत.

हे वाचलं का?

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत, हा नरसंहार पाहिल्यानंतरही जी लोकं शांत आहेत ते आधीच मेलेले आहेत. परंतू आम्ही शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.

दरम्यान काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधीदेखील लखनऊमध्ये दाखल झाल्याअसून त्या सोमवारी लखीमपूर खेरीमध्ये जाणार आहेत.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत, किसान एकता मोर्चा, अखिलेश यादव यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी राज्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर भाजपचे नेते ना गाडीतून फिरु शकतील ना गाडीतून खाली उतरू शकतली असा इशारा दिला आहे. तसेच अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी तेनी गावात बनवीरमध्ये उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर ताबा मिळवत कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले असताना याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

    follow whatsapp