NCB चं पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईला येणार आहे. NCB वर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे हे पथक मुंबईत येणार आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने मीडियासमोर येऊन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. या सगळ्या प्रकरणानंतर आता NCB चं पथक चौकशी करण्यासाठी मुंबईत येणार आहे. NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह चार इतर अधिकारी मुंबईत येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे के. पी. गोसावी यांच्या बॉडीगार्डने?
आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये प्रमुख साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली. त्यातले 8 कोटी हे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे होते असं प्रभाकर साईलने म्हटलं आहे. या प्रकरणात पंच म्हणून माझी सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. मला ज्या कागदांवर सह्या करायला लावल्या. सईल यांनी हेदेखील सांगितलं मी माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचितांकडे 10-12 दिवस राहिलो होतो.
साईल यांनी गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय. यात 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे.
आणखी काय केले आहेत आरोप?
किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर याने आज तक सोबत एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आहे. यामध्ये प्रभाकर याने एका नोटरीकृत प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला आहे. कोऱ्या प्रतिज्ञापत्रावर माझ्या सह्या घेण्यात आल्या असं प्रभाकरने म्हटलं आहे. प्रभाकर हा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे. त्याला साक्षीदार क्रमांक एक असं म्हटलं आहे. आपल्याला तिथे काय होणार आहे हे कळलं नव्हतं. पंचनाम्याचे कागद आहेत असं सांगून माझ्या सह्या घेण्यात आल्या आहेत असं प्रभाकरने सांगितलं होतं
ADVERTISEMENT