आज महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याचा राजीनामा होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. आज अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की ते मला माहित नाही. पण आज एक राजीनामा होईल असं त्यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळपर्यंत अनेक घडामोडी घडतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. सचिन वाझे प्रकरणात नाना पटोले स्वतःचं हसं करून घेत आहेत असाही टोला त्यांनी लगावला.
ADVERTISEMENT
NIAच्या चौकशीला जाताना सचिन वाझेंनी का नेला नव्हता मोबाईल?
सचिन वाझेंना पाठिशी घालू नये असं काँग्रेस म्हणतं आहे. यावर विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की नाना पटोले असं बोलून हसं करून घेत आहेत. सत्तेत असलेले तीन पक्ष हे कृत्रीमरित्या सोबत आहेत. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली असती तर यांच्यातला कृत्रीमपणा समोर आला असता असंही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सचिन वाझेंचं जे प्रकरण आहे त्याची प्रकरणं मूळं बरीच लांबवर गेली आहेत. आज संध्याकाळपर्यंत मोठ्या घटना घडतील असं वाटतं.
सचिन वाझे प्रकरणाची तार मातोश्रीशी – नवनीत राणांचा हल्लाबोल
सचिन वाझे प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, वाझे प्रकरणात दोन तपासयंत्रणा काम करत आहेत. त्यातून अनेक खळबळजनक माहिती उजेडात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा झालाय. तर एका मंत्र्याचा राजीनामा होता होता वाचला. आता सचिन वाझे प्रकरणी आणखी एका मंत्र्याचा राजीनामा लवकरच होईल, असं सांगत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडं अप्रत्यक्षरित्या बोट दाखवलं.
ADVERTISEMENT