गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची थोडी सुधारणा आहे. मात्र त्याचं वय 92 असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. गेल्या शनिवारी त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली तरीही त्यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला आहे. लता मंगेशकर यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी मुंबई तकशी बोलताना ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चौकशी केली. तसंच गरज पडल्यास मीदेखील रूग्णलयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करेन असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना कोरोनासोबतच निमोनियानेही ग्रासलं आहे.
2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी
2019 मध्येही लतादीदींना न्युमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
लता मंगेशकर यांना मागच्या शनिवारी रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. प्रतीत समदानी हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर या आम्हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, भाचीने सांगितलं कशी आहे प्रकृती?
ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील प्रोफेसर डॉ. प्रतीत समदानी गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर यांची काळजी घेत आहेत. त्यांनी खुलासा केला आहे, की त्यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना शनिवारी रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्यांना कोरोनासोबतच निमोनिया झाल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु यापुढे त्यांनी दिदीची कोणतीही हेल्थ अपडेट दिलेली नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांना आपल्या एका कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली होती. तो लता मंगेशकर यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT