Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंट (Delta variant)च्या mRNA लस प्रभावी आहेत. शास्त्रज्ञांनी केलेल्या घोषणेच्या एक दिवसानंतर एका नव्या स्टडीनुसार असं समोर आलं आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus)संसर्गातून बरे झालेल्या लोकांवर Sputnik-V या रशियन लसीचा एक डोस हा पुरेसा आहे. कारण ही लस तब्बल 94 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. जे कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्यासाठी एक डोस पुरेसा आहे असं नव्या संशोधनात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, याशिवाय कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचा देखील एक डोस पुरेसा असल्याचं काही संशोधनातून समोर आलं होतं. कारण कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे लसीचा पहिला डोस परिणामकारक असल्याचा दावा वेगवेगळ्या संशोधनातून करण्यात आला आहे.
तथापि, अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की लसच्या दुसर्या डोसमुळे अँटिबॉडी आणि कोविड संसर्ग निष्प्रभावी करण्याची क्षमता वाढते. सायन्स डायरेक्ट या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, Sputnik-V लसीचा पहिला डोस मिळाल्यानंतर 21 दिवसानंतर 94 टक्के लोकांना स्पाइक-स्पेसिफिक अँटीबॉडी विकसित केली. अर्जेंटिनामधील आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे संशोधन करण्यात आलं आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, Sputnik-V लसीचा एकच डोस कोरोनापासून बरे झालेल्या लोकांना अँटिबॉडी तयार होण्यास अधिक मदत करतं.
Covishield लसीचा एक डोसही आहे पुरेसा, भारतातही करण्यात आलं आहे संशोधन
यापूर्वी, हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलच्या संशोधनानुसार असा दावाही करण्यात आला होता की, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये मजबूत अँटिबॉडी प्रतिक्रियेमुळे लसीचा एक डोसही पुरेसा आहे. हे संशोधन 260 आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलं होतं. ज्यांना 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान Covishield लसीचा एक डोस देण्यात आला आहे.
डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध 90% पर्यंत प्रभावी Sputnik-V
Sputnik-V च्या निर्मात्यांनी जूनमध्ये असा दावा केला होता की, ही लस अत्यंत संसर्गजन्य डेल्टा व्हेरियंट विरूद्ध 90 टक्के प्रभावी आहे. आरआयए न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार मॉस्कोच्या गामालेया इन्सिट्यूटचे उपसंचालक डेनिस लोगुनोव्ह म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंटवरील डेटा हा मेडिकल रेकॉर्ड्सनुसार गोळा केला गेला होता.
भारतात मंजुरी मिळालेली तिसरी लस
Sputnik-V ही लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेत वापरली जाणारी तिसरी लस आहे. त्याचवेळी मे महिन्यात रशियामध्ये आपत्कालीन वापरासाठी Sputnik लाईट प्रभावी मानली गेली आहे. ही रशियामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. भारतातही त्याच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची चर्चा सुरु आहे.
Sputnik-V लसीबाबत मोठी बातमी, Serum आणि रशियन कंपनीमध्ये मोठा करार
कशी काम करते लस?
Vaccine स्पाइक प्रोटीन तयार करण्यासाठी SARS-CoV-2च्या अनुवांशिक सूचना वापरते. ही माहिती डबल-स्ट्रँडेड डीएनएमध्ये स्टोअर करते. लस ही अॅडिनोव्हायरसपासून विकसित केली गेली आहे. संशोधकांनी कोव्हिड स्पाइक प्रोटीनसाठी जनुक दोन अॅडिनोव्हायरसमध्ये जोडली आणि त्यांचा परिणाम बाधित पेशींवर हल्ला करण्यासाठी केला. Sputnik-V, जॉन्सन अँड जॉन्सन यांनी विकसित केलेल्या इबोलासाठी लस तयार करण्याच्या प्रक्रियेने प्रेरित आहे.
ADVERTISEMENT