ADVERTISEMENT
राजस्थानमधील अलवरमध्ये 2 ऑक्टोबर 2017 रोजी संतोष नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह पती, तीन मुले आणि पुतण्याची निर्घृण हत्या केली.
या प्रकरणी न्यायालयाने महिला आणि प्रियकराला 5 वर्षांनंतर दोषी असल्याचं सिद्ध करत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
हत्येपूर्वी आरोपी महिला संतोष उर्फ संध्या हिने कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या मिसळून जेवण दिलं होतं.
यानंतर संतोषने घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर तिचा प्रियकर आणि साथीदार घरात घुसले.
सर्वात आधी त्यांनी संतोषचा पती बनवारी आणि मोठा मुलगा अमन यांचा चाकूने गळा चिरून खून केला.
इतर मुले उठू लागताच त्यांचाही चाकूने गळा चिरून खून केला. संतोष हा सगळा प्रकार पायऱ्यांवर उभा राहून पाहत होता.
खरं तर संतोष आणि हनुमान प्रसाद (प्रियकर) एकत्र तायक्वांडो शिकायचे. यादरम्यान दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले.
दोघांमध्ये ३ वर्ष अफेअर होतं. ही बाब बनवारीला कळताच त्याने पत्नी संतोषला मारहाण केली.
यावेळी त्रस्त झालेल्या संतोषने हनुमानसह कुटुंबाला मारण्याचा कट रचला.
ADVERTISEMENT