Rape Case: आधी मॉलला बोलवलं नंतर हॉटेलमध्ये नेऊन केला.., महिलेचा बॉसवर आरोप

मुंबई तक

13 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:45 AM)

गुरूग्राम: भारतात बलात्काराच्या (Rape Case) प्रकरणात सध्या वाढ होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राजधानी दिल्लीजवळील गुरूग्राममध्ये असाच एक अमानुष प्रकार घडला आहे. गुरुग्राममध्ये (Gurugram) एका 30 वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. खाण्यातून अंमली पदार्थ देऊन तिच्यावर नंतर बलात्कार केला असे तिने आपल्या आरोपात म्हटलं आहे. महिलेना बलात्कारप्रकरणी आपल्या […]

Mumbaitak
follow google news

गुरूग्राम: भारतात बलात्काराच्या (Rape Case) प्रकरणात सध्या वाढ होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राजधानी दिल्लीजवळील गुरूग्राममध्ये असाच एक अमानुष प्रकार घडला आहे. गुरुग्राममध्ये (Gurugram) एका 30 वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. खाण्यातून अंमली पदार्थ देऊन तिच्यावर नंतर बलात्कार केला असे तिने आपल्या आरोपात म्हटलं आहे. महिलेना बलात्कारप्रकरणी आपल्या बॉसवरच आरोप केले आहेत. महिलेला असाही आरोप केला आहे की, तो व्यक्ती आता तिला ब्लॅकमेल करत आहे.

हे वाचलं का?

पीडित महिलेला दोन मुली आहेत. महिलेने कोरोना काळात लॉकडाऊननंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निवडला. लाइव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल इंटरॅक्शनसाठी तिने ऑनलाइन “MICO अॅप”साठी घरून काम करण्यास सुरूवात केली. याच अॅपच्या मॅनेजरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक वेद प्रकाश यांनी या प्रकरणाची दखल घेत म्हटले की, ‘आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत आणि आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकत आहोत.’

Ana Montes : १७ वर्ष अमेरिकेच्या नाकाखालून हेरगिरी करणारी ‘डबल एजंट’

पाच आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवत गुन्हा दाखल!

पीडित महिलेने पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर नोंदवत तक्रार केली. ज्यामध्ये तिने म्हटलं की, तिच्या मॅनेजरनेच तिच्यावर ही बळजबरी केली. तिने मॅनेजरच्या इतर सहकाऱ्यांवरही छेडछाडीचा आरोप केला आहे. तक्रारीनंतर, पोलीस ठाण्यात IPC कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 506 (धमकी), 34 (सामान्य हेतू) आणि आयटी कायद्याच्या कलम 67-अ आणि 72 अंतर्गत पाच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने मॅनेजरची ऑफर नाकारल्याने, जाळ्यात अडकवण्याचे षडयंत्र…

महिलेने आपल्या आरोपात म्हटलं आहे की, ‘अॅप मॅनेजर कुणाल सिंह यांने मला पगार अॅडव्हान्स देण्याची ऑफर दिली, पण ती ऑफर मी नकारली. यानंतर त्याने माझा तीन महिन्यांचा पगारही दिला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आरोपीने 14 ऑगस्टला मला अॅम्बियन्स मॉलमध्ये बोलावले. मॉलच्या बाहेर त्याने माझ्यासाठी काही पराठे आणि कोल्ड्रिंक्स मागवले होते. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर मला चक्कर येऊ लागली. याचाच फायदा घेत आरोपीने मला एका जवळच्या हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला.’

बलात्कारानंतर फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिलेवर बलात्कारानंतर आरोपीने तिचे फोटो काढले आणि व्हिडीओ देखील शूट केलं, यानंतर हे फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

    follow whatsapp