पुणे: जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द गावातील एका 34 वर्षीय महिलेने एकाच वेळी तब्बल 3 बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता.
ADVERTISEMENT
सोमवारी (21 जून) सकाळी या महिलेने पुन्हा तिन बाळांना जन्म दिला असून बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पोथरकर यांनी सांगितले.एकाच वेळी तिन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे.
हिवरे खुर्द येथील जोस्त्ना विठ्ठल वायकर यांनी काही वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मूल होणे शक्य नव्हते.
कपिल शर्माच्या घरी पुन्हा हलला पाळणा
मात्र, तरीही त्यांना आणखी एक मूल हवं असल्याने त्या प्रयत्न करत होत्या. मधल्या काळात त्यांनी अनेक उपचारही घेतले मात्र, काही केल्या उपचार लागू पडत नव्हते. अखेर जोत्स्ना यांनी जुन्नरमधील डॉ. पोथरकर यांच्याकडे उपचार घेण्यासाठी गेल्या.
सुरुवातीला डॉ. अविनाश पोथरकर व डॉ. मुक्तांजली पोथरकर यांनी दिलासा दिला व होमिओपाथी उपचार सुरु केले. ज्यानंतर काही दिवसांनी जोत्स्ना या पुन्हा गरोदर राहिल्या. दरम्यान, जेव्हा त्यांची सोनोग्राफी करण्यात आली त्याचवेळी त्यांच्या गर्भात तीन बाळ असल्याचे आढळून आले. पण यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली होती.
दरम्यान, डॉ. पोथरकर जोडप्याने त्यांच्यावर होमिओपॅथीचे उपचार पुढे तसेच सुरु ठेवले. अखेर 21 जून रोजी जोस्त्ना यांनी तिन बाळांना सुखरुप जन्म दिला.यामध्ये 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. या सर्वांची वजने ही 2 किलोपेक्षा जास्त आहेत.
एकाच वेळी तिन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डॉ. पोथरकर यांनी सांगितले.
या बाळांना व बाळाच्या आईला सुखरुप ठेवण्यासाठी डॉ. पोथरकर यांच्या बरोबरच जुन्नर येथील शिंगोटे हॉस्पिटलचे डॉ प्रसाद शिंगोटे, डॉ. मोनाली शिंगोटे व आळेफाटा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. कसबे यांनी विशेष काळजी घेतली.
Pune: १७ वर्षांनी जुळ्या मुलींना जन्म दिला आणि कोरोनानं घात केला; पुण्यातील मन हेलावून टाकणारी घटना
दरम्यान, होमिओपॅथी उपचाराने वंधत्व निवारण होऊ शकते असा विश्वास डॉ. अविनाश व डॉ. मुक्तांजली पोथरकर यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ अविनाश पोथरकर यांनी यापूर्वीही अनेक जोडप्यांवर शुद्ध होमिओपॅथिक उपचार पद्धतीने वंध्यत्वावर यशस्वी उपचार केले आहेत.
ADVERTISEMENT