आमिर खान म्हणतो; ‘…त्यावेळी आम्ही कोरोना आणि करिना दोघांशीही लढत होतो’

मुंबई तक

• 11:45 AM • 13 Apr 2021

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूममीवर आमिरच्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाचं शूटींगही थांबलं होतं. या सिनेमाविषयी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान आमिरने माहिती दिली. यावेळी आमिरने सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो असं म्हटलंय. सध्या आमिर त्याच्या […]

Mumbaitak
follow google news

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूममीवर आमिरच्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाचं शूटींगही थांबलं होतं. या सिनेमाविषयी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान आमिरने माहिती दिली. यावेळी आमिरने सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो असं म्हटलंय.

हे वाचलं का?

सध्या आमिर त्याच्या लाल सिंह चढ्ढा सिनेमामध्ये व्यस्त आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, फिल्मचं शूटींग सुरु असताना कोरोनाने थैमान घातला होता. अशाच परिस्थितीत अभिनेत्री करीनाने ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी ती परिस्थिती फारच बिकट झाली होती. करिना गरोदर असल्यामुळे आम्हाला अधिक खबरदारी घेऊन शूटींग करावं लागत होतं. यामुळेच सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना असं दोघांनाही सामोरे जात होतो.”

आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर लवकरच ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.

आमिर आणि करिनाचा लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाला रिलीज झाल्याच्या वर्षी सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचा अकॅडमी पुरस्कारही मिळाला होता.

    follow whatsapp