गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढतो आहे. आता याचा फटका अभिनेता आमिर खानलाही पडला आहे. आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच आमिर खानने आपला वाढदिवसही साजरा केला. आमिर खानने नुकतीच कोरोनाची चाचणी केली. या चाचणीत तो कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. आमिर खानने तात्काळ आपल्या मुंबईतील राहत्या घरीच स्वत:ला होम क्वारांटाईन करून घेतले आहे. तसेच त्याने आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट करायला सांगितलं आहे. त्याचसोबत आमिर खानच्या सर्व घरातील स्टाफलाही त्याने योग्य ती खबरदारी घ्यायला सांगितली आहे.
ADVERTISEMENT
दोन दिवसांपूर्वी आमिर खान आणि त्याची पाणी फाऊंडेशनची टीमने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यावेळी तिथे एक छोटेखानी कार्यक्रमही झाला होता. ज्यात आमिर खान आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सहभागी झाले होते. त्यानंतर मंगळवारी आमिर खानने कोरोनाची टेस्ट केली असता बुधवारी त्याची टेस्ट कोरोना पॉझिटीव्ह आली. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी,मनोज वाजपेयी, सतिश कौशिक, तारा सुतारिया ,कार्तिक आर्यन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT